दिल्‍ली स्‍फोटातील दहश्‍ातवाद्यास अटक

Posted on Sunday, March 07, 2010 by maaybhumi desk


लखनऊ

उत्तर प्रदेश पोलिसांच्‍या एटीएस पथकाने दिल्लीत झालेल्‍या मालिकाबद्ध स्फोटांसह अनेक दहशतवादी कारवायांमध्‍ये हवा असलेला आरोपी सलमान उर्फ छोटू यास अटक केली आहे. सलमान हा उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील रहिवासी आहे.

दिल्ली स्‍फोटानंतर झालेल्‍या बाटला हाऊस चकमकी दरम्यान फरार झालेल्‍या सलमानवर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्‍यात आले होते. त्‍याच्‍यावर 23 नोव्‍हेंबर 2007 मध्‍ये वाराणसी न्‍यायालयात झालेल्‍या स्‍फोटाचाही आरोप आहे.

आमीर व शाहरुख पुणे स्‍फोटाचे सुत्रधार


राज्याचे अप्‍पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बृजलाल यांनी दिलेल्‍या माहितीनुसार सलमान उर्फ छोटू याला नेपाळ सीमेवर असलेल्‍या सिद्धार्थनगर जिल्‍ह्यातील बढनी भागातून अटक करण्‍यात आली आहे. पुण्‍यातील जर्मन बेकरीत झालेल्‍या स्‍फोटातही सलमानचा हात असल्‍याचा  संशय तपास यंत्रणांनी यापूर्वी वर्तविला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "दिल्‍ली स्‍फोटातील दहश्‍ातवाद्यास अटक"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner