सेक्स रॅकेट चालविणा-या इच्छाधारी बाबावर मोक्का
Posted on Sunday, March 07, 2010 by maaybhumi desk
सेक्स रॅकेट चालविणा-या इच्छाधारी बाबा ऊर्फ स्वामी भीमानंदवर दिल्ली पोलिसांनी अखेर मोक्का लागू केला आहे. बाबावर संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. यामुळे आता बाबाभोवतीचा फास आवळला जाणार आहे.
दुस-या बाजूला इच्छाधारी बाबाने आपल्याला फसविण्यात येत असल्याचा कांगावा केला असून आपण कुठल्याही सोनू पंजाबनला ओळखत नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार या भोंदू बाबाने सेक्स रॅकेटच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात 25 हजार कोटींची संपत्ती गोळा केली आहे. बाबाच्या रॅकेटमध्ये पाचशे पेक्षा जास्त मुलींचा भरणा होता. बाबा मेहनत न करता अधिक पैसा कमविणा-या मुलींना आपल्या रॅकेटमध्ये गुंतवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बाबा देहविक्रय करणा-या मुलींना इतरांच्या तुलनेत पैसेही अधिक देत असल्याने त्याच्या रॅकेटमध्ये एअरहोस्टेस, एमबीएच्या विद्यार्थिनी आणि स्ट्रगलिंग एक्टर्सचाही समावेश होता.
लेबले:
baba,
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "सेक्स रॅकेट चालविणा-या इच्छाधारी बाबावर मोक्का"
Post a Comment