लोकशाही उलथून टाकण्‍याचा माओवाद्यांचा इरादा!

Posted on Saturday, March 06, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

सशस्त्र संघर्षाच्‍या माध्यमातून भारतीय लोकशाही उखडून फेकण्‍याचा आणि 2050 पर्यंत देशावर नियंत्रण करण्‍याचा माओवाद्यांचा कट असल्‍याची माहिती केंद्रीय गृह सचिव गोपाल कृष्ण पिल्लई यांनी दिली आहे.

‘लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म इन इंडिया’ या विषयावर आयोजित एका परिसंवादात पिल्लई यांनी सांगितले, की दहशतवादी कारवायांसाठी माओवाद्यांना काही माजी सैनिकांकडून मदत दिली जाण्‍याची शक्यता असून भारतीय लोकशाही विरोधात युध्‍द करण्‍याचा कट माओवाद्यांनी रचला आहे.

या संदर्भात माओवाद्यांनी 2050-60 पर्यंतचे उद्दीष्‍ट निश्चित केले आहे. नक्षलवाद हळूहळू संपूर्ण देशाला विळखा घालत चालल्‍याचेही त्यांनी सांगितले.

पिल्लई म्हणाले, की नक्षलवादी एखाद्या स्‍लो पॉईजनसारखे काम करीत असून ते भारतीय अर्थव्यवस्थेवरही हल्‍ला करण्‍याच्‍या तयारीत आहेत. मात्र त्‍यांनी आपले निश्चित उद्दीष्‍ट गाठण्‍यासाठी नियोजनबद्ध खेळी केली असून टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने ते सर्व करण्‍याच्‍या तयारीत आहेत. जर त्यांनी कारवाईत घाई केली तर सरकार त्यांच्‍यावर कठोर कारवाई करू शकते हे हेरून माओवादी पावले उचलत असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "लोकशाही उलथून टाकण्‍याचा माओवाद्यांचा इरादा!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner