इंडियन आयडलच्‍या ऑडीशनमध्‍ये चेंगराचेंगरी

Posted on Tuesday, March 09, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

इंडियन आयडलच्‍या ऑडीशनसाठी (प्रवेश पात्रता फेरी) आलेल्‍या तरुणांच्‍या गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी केलेल्‍या लाठीहल्‍ल्‍यामुळे चेंगराचेंगरी झाल्‍याने त्‍यात 12 जण जखमी झाल्‍याची घटना नॉएडा शहरातील सेक्टर 62 या भागात घडली आहे. जखमींना येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

या संदर्भात मिळालेल्‍या माहितीनुसार, इंडियन आयडल या बहुचर्चित रिएलिटी स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी नॉएडा शहरात प्रवेश पात्रता फेरी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. यासाठी आसपासच्‍या शहरातून मोठ्या संख्‍येने तरुण-तरुणींची गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी जमावावर सौम्‍य लाठीमार करताच धावपळ होऊन यावेळी झालेल्‍या चेंगराचेंगरीत 12 जण जखमी झाले आहेत.

जखमींना येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्‍यात आले असून जखमींची प्रकृती स्थिर आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "इंडियन आयडलच्‍या ऑडीशनमध्‍ये चेंगराचेंगरी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner