गोंधळ घालणा-या सात खासदारांचे निलंबन
Posted on Tuesday, March 09, 2010 by maaybhumi desk
महिला आरक्षण विधेयकास विरोध करण्यासाठी राज्यसभेत गोंधळ घालणा-या आणि सभापतींच्या दिशेने विधेयकाचे कागद फाडून भिरकावणा-या समाजवादी व राजदच्या सात खासदारांना सभागृहातून चालू अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा सभापती हामीद अन्सारी यांनी केली आहे.
मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पक्ष व लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने महिला आरक्षणास विरोध दर्शविला असून त्या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सभागृहाच्या कामकाजात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विधेयक सादर करण्यास विरोध दर्शविण्यासाठी या खासदारांनी सभापती अन्सारी यांच्या आसनापर्यंत जाऊन जोरदार घोषणाबाजी करत विधेयकाचे कागद फाडून सभापतींवर भिरकावले होते. तर त्यांच्या समोरील माईकही काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. सभागृहाचे सभापती आणि उपराष्ट्रपतींच्या दिशेने कागदपत्रे भिरकावणे हा त्यांच्यावरील हल्ला समजण्यात आला असून त्याबाबत गंभीर भूमिका घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सभागृहाचा आणि सभापतींचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून गोंधळ घालणा-या आमीर अली खान, कमाल अख्तर, नंद किशोर, सुभाष यादव, साबीर अली, एजाज खान व वीरपाल सिंह या सातही खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय बहुमताने सभागृहात घेण्यात आला आहे.
तत्पूर्वी, राज्यसभेचे कामकाज सुरू होताच मंगळवारीही सपा व राजदच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर कामकाजास सुरूवात होताच गोंधळ घालणा-या खासदारांवर निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला तो सभागृहाने बहुमताने मंजूर केला असून संपूर्ण अधिवेशन काळासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांशी चर्चेनंतरही यादवी कायम
विधेयकावर सर्वपक्षीय बैठकीनंतर निर्णय
गोंधळात विधेयक सादर
सपाने केंद्र सरकारचा पाठिंबा काढला
महिला आरक्षण विधेयकावर 'यादवी'
आरक्षण विधेयका संदर्भात जदयुतील मतभेद संपले
महिला आरक्षण विधेयकावर काऊंटडाऊन सुरू
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "गोंधळ घालणा-या सात खासदारांचे निलंबन"
Post a Comment