ठाकरे विषारी बोलू नकाः न्‍यायालय

Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

परप्रांतियांविरोधात विद्वेष पसरविणारी वक्तव्ये करू नये अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली आहे. अशी वक्तव्ये करण्याचे न थांबविल्यास त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करू असा इशाराही दिला आहे.

राज यांच्यावर पाटणा, जमशेदपूर आणि मध्य प्रदेश या ठिकाणी अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे सगळे खटले दिल्लीत एकाच ठिकाणी आणावेत अशी मागणी राज यांनी एका याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. त्यासंदर्भात कोर्टाने त्यांना आज ही तंबी दिली.


राज यांच्यावर महाराष्ट्रातच ७३ गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. उत्तर भारतीयांविरोधात कथितरित्या विद्वेषकारी विधाने केल्यानंतर उसळलेल्या आंदोलनाची परिणती ठिकठिकाणी दंगली, जाळपोळीतून झाल्याने त्यासाठी राज यांना जबाबदार ठरवून त्यांच्याविरोधात हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 



राज यांच्‍यावर महाराष्‍ट्रात 73 खटले
 मराठी माणसाने मराठीतूनच बोलावेः राज
 जन्‍माने मराठी असणा-यांनाच नोकरी द्याः राज
मुंबई कष्‍टक-यांचीहीः आशा भोसले
...तर एकही टॅक्सी चालू देणार नाहीः राज
...तर मी पक्ष बंद करीनः राज
राम कदमांची 24 तास 'मनसे' सेवा


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




1 Response to "ठाकरे विषारी बोलू नकाः न्‍यायालय"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner