मुंबईच्या मा-यासमोर डेक्कन डिस्चार्ज
Posted on Monday, March 29, 2010 by maaybhumi desk
आपला धमाकेदार फॉर्म कायम ठेवत मुंबई इंडियन्सने डेक्कन चार्जर्सचा 41 धावांनी मोठा पराभव केला असून आपले पहिले स्थान अधिक बळकट केले आहे. मुंबईच्या 173 धावांच्या मजबूत आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन चार्जर्स संघ केवळ 131 धावांवर बाद झाला.
या विजयासह मुंबईने आपल्या विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. सामनावीर ठरलेल्या हरभजन सिंहने धमाकेदार फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला. हरभजनेने 18 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. तर तीन बळी घेतले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित षटकात 172 धावा केल्या. मुंबईकडून हरभजन सिंहने 18 चेंडूत नाबाद 49 धावांची रेकॉर्ड फलंदाजी केली. तर कर्णधार सचिन तेंदुलकरने 43 चेंडूत 55 धावांची खेळी केली डेक्कनकडून आर.पी.सिंहने तीन गडी बाद केले.
