आठ भारतीय जहाज व 140 प्रवाशांचे अपहरण

Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

सोमालियन सागरी चाच्‍यांनी आठ भारतीय जहाजांचे अपहरण केले असून या जहाजावरील 140 जणांनाही ताब्यात घेण्‍यात आले आहे. सध्‍या जहाज कुठे आणि ओलीस ठेवलेले लोक कुठल्‍या स्थितीत आहेत याबाबत माहिती गोळा करण्‍यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्‍या आहेत.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार सागरी चाच्‍यांनी बंदी बनविलेल्‍या जहाज आणि लोकांना सोमालियातच ठेवले असून जागेची निश्चित अशी माहिती मिळू शकलेली नाही. ओलीस ठेवलेले आठही जहाज गुजरातमधील आहेत.


या जहाजांना ओलीस ठेवल्‍याची माहिती या भागातून जात असलेल्‍या जहाजांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांना दिली.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner