शोएबचे पासपोर्ट जप्त, भारत सोडण्यास मनाई
Posted on Monday, April 05, 2010 by maaybhumi desk
सानियाच्या घरी शोएबची चौकशी, आयशाचीही चौकशी
हैदराबाद
टेनिस स्टार सानिया मिर्झाशी विवाहबद्ध होण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने काही दिवसांपूर्वीच आपल्याशी विवाह केला असल्याचा दावा करणा-या आयशा सिद्दीकीच्या दाव्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी हैदराबाद पोलीस सानियाच्या घरी दाखल झाले असून शोएबची चौकशी झाली आहे. चौकशी दरम्यान तपास अधिका-यांनी त्याचे पासपोर्ट जप्त केले असून त्याला भारत सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, शोएबला या प्रकरणाचा तपास सुरू असेपर्यंत भारत सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आल्याचे अंतर्गत सुत्रांनी सांगितले असून शोएबची चौकशी एस.पी. रवींद्र रेड्डी हे स्वतः करीत आहेत. या प्रकरणामुळे सानिया व शोएब यांचा विवाह धोक्यात आला आहे.
आयशाने शोएबच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात शारीरिक शोषण आणि धोका दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या संदर्भात आयशाचीही चौकशी केली जात असून वरिष्ठ पोलीस अधिकारी तिच्याही घरी दाखल झाले आहेत.
तपासात शोएब मलिकने समाधानकारक उत्तरे न दिल्यास त्याला अटकही केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Police at Sania Mirza's residence to quiz Shoaib
Hyderabad
Police today reached the residence of tennis star Sania Mirza apparently to question Pakistani cricketer Shoaib Malik in the wake of a cheating case lodged against him by the father of Ayesha, the Hyderabad girl who claims to be his wife.
In fresh trouble for 28-year-old Shoaib, who is scheduled to get married to 23-year-old Sania here on April 15, the Hyderabad Police have alerted the immigration authorities about the criminal complaint, a move that could pose difficulties for Shoaib to leave the country.
There was no immediate official word on why the police have gone to the Mirza residence.
The charges against Shoaib are that of harassment of Ayesha, cheating to marry another girl and criminal intimidation including threats to her to keep quiet, Hyderabad Police Commissioner A K Khan said.

लेबले:
breaking news,
cricket,
current news,
hot news,
international news,
IPL,
latest news,
national news,
news,
sports,
top news,
world news
