लेनिन यांचे पार्थिव दफन करण्याची मागणी
Posted on Friday, April 23, 2010 by maaybhumi desk
रशियात पुन्हा एकदा ब्लादिमीर लेनिन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून ते दफन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रशियन साम्यवादी क्रांतीचा जनक समजल्या जाणा-या लेनिन यांचा 140 वे जयंती वर्ष सध्या देशभर साजरे केले जात असून या संदर्भात रशियन नेते आणि कार्यकर्त्यांनी लेनिन यांचे मृतदेह स्थायी रित्या दफन करण्याची मागणी केली आहे.
सध्या लेनिन यांचे पार्थिव रेड स्क्वेअर येथील लेनिन संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. रशियन क्रांतीचा जनक असलेल्या लेनिनचा जन्म सीमबीरस्क प्रांतात 22 एप्रिल 1870 रोजी झाला होता. त्यांचे वडील माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. लेनिन यांनी बोल्तशेविक पार्टीची स्थापना केली. ते सोव्हीयत संघाचे नेते आणि ऑक्टोबर 1917 मध्ये झालेल्या रशियन क्रांतीचे जनक समजले जातात.
सोव्हीयत रशियाच्या विघटनानंतर लेनिन यांचे पार्थिव वादाचा मुद्दा ठरले असून साम्यवादी नेत्यांनी या संदर्भातील सर्व मागण्यांचा विरोध केला आहे. तर रशियन सत्ता केंद्र क्रेमलिननेही लेनिन यांचे पार्थिव रेड स्केअरमध्येच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.

Subscribe to:
Post Comments (Atom)
1 Response to "लेनिन यांचे पार्थिव दफन करण्याची मागणी"
it should buried now.
Post a Comment