दंतेवाडाः नक्षलींनी बस उडवली, 50 ठार

Posted on Monday, May 17, 2010 by maaybhumi desk

दंतेवाडा

छत्तीसगडच्‍या दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी एका प्रवासी बसवर आयईडीचा वापर करून घडवून आणलेल्‍या स्‍फोटात 50 जण ठार झाले आहेत. मृतांमध्‍ये छत्तीसगडच्‍या काही विशेष पोलीस अधिका-यांचाही समावेश आहे. गेल्‍या महिन्‍यातील हा दुसरा मोठा स्‍फोट आहे.

दंतेवाडा जिल्‍ह्यातील गडीरास येथून भुसारसकडे ही बस चालली होती. नक्षलींनी यापूर्वी गावक-यांना पोलिसांसोबत प्रवास न करण्‍याची तंबी दिली आहे. मात्र ती पाळली न गेल्‍याने हा हल्‍ला घडवल्‍याचा दावा नक्षलींनी केला आहे.
गेल्‍या महिन्‍यात जगदलपूर जवळील चिंतलनार जंगलात नक्षलींनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात सीआरपीएफचे 78 जवान ठार झाले होते. त्‍यानंतरही या भागात नक्षली कारवाया सुरूच असून आज पुन्‍हा मोठा हल्‍ला करण्‍यात आला आहे.

घटनास्‍थळी पोलीस आणि सीआरपीएफचे जवान रवाना झाले असून जखमींना जवळच्‍या सरकारी रुग्णालयात दाखल करण्‍यासाठी हेलिकॉप्‍टरचा वापर केला जात आहे. नक्षलींनी या हल्‍ल्‍यात आयईडी या स्‍फोटकाचा वापर केल्‍याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

नक्षलींनी पाच राज्यांमध्‍ये जाहीर केलेल्‍या 48 तासांच्‍या बंद पूर्वी हा हल्ला झाला आहे.



Maoists attack cops,civilians in Dantewada and 50 killed

Raipur (PTI)

Maoists today blew up a bus killing at least 40 persons, including several Special Police Officers (SPOs), in Dantewada district of Chhattisgarh, in the second brazen attack in little over a month.

The Naxals attacked the bus carrying passengers from Gadiras to Bhusaras in Dantewada district, nearly 400 kms from here, using Improvised Explosive Device (IED) at around 16:45 hrs, officials said.

The SPOs, who are civilians assisting police in fighting the Naxals, were attached to Dantewada police, they said.

The IED was planted on a metalled road and detonated by the Left-Wing Extremists using remote control device.

The attack came a day before the Maoists' call for a 48-hour bandh in five states, including Chhattisgarh, from tomorrow in protest against the security operations launched against them by the Centre.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner