दंतेवाडा: नीमलष्कराचे अभियान सुरू, हायअलर्ट
रायपूर
छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून केल्या जात असलेल्या भू-सुरूंग स्फोटानंतर जंगलात तपासणी अभियान सुरू करण्यात आले असून नक्षलींच्या दोन दिवसांच्या घोषणेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मंगळवारी घटनास्थळ आणि त्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात केले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
या संदर्भात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भू-सुरूंग स्फोट घडविण्यात आला त्यावेळी या ठिकाणी नक्षलींची संख्या कमी होती. स्फोटानंतर नक्षलींनी गोळीबारही केला. घटनास्थळावरून एके 47 रायफलच्या काडतूसवरून या हल्ल्यात नक्षली मिल्ट्री प्लाटूनचे हल्लेखोर सहभागी होते ही बाब लक्षात आली आहे. नक्षलींनी स्फोटानंतरही गोळीबार केला. मात्र जखमी एसपीओ आणि जवानांच्या कारवाईमुळे ते शस्त्रास्त्रे लुटून नेऊ शकले नाहीत.