नक्षलींचा हिंसक बंद, 4 जवान शहीद
कोलकाता
पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापुर येथे झालेल्या एका भू-सुरुंगाच्या स्फोटात सीआरपीएफचे 4 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी पेट्रोलिंगवर जात असलेल्या जवानांच्या एका गाडीला या स्फोटांनी उडवून दिले आहे. सीआरपीएफ
जवान गाडीने गस्तीवर जात असताना रस्त्यावर लँडमाइन स्फोटात चार जवानांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आहेत.
चार जवानांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी पोलिसांना आणखी दोन सुरूंग आढळून आले असून या घटनेनंतर जंगलातील इतर भागात सुरू असलेले नक्षल विरोधी अभियान त्वरित थांबविण्यात आले असून सर्व जवानांना आपल्या कॅम्पमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नक्षलींनी 5 राज्यांमध्ये 48 तासांच्या बंदची घोषणा केली असून यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालच्या खडगपूर पोलीस स्टेशन अंतर्गत दक्षिण पूर्व रेल्वेच्या हावडा-मुंबई मार्गावर गिधनी आणि खटपुरा स्टेशन्स दरम्यान नक्षसलींनी पहाटे भू-सुरुंगाचा स्फोट घडवून रेल्वे रूळ उघडून दिला आहे. या घटनेनंतर या मार्गावरून गेलेली एक मालगाडी रूळावरून घसरली असून त्यात गाडीचा चालक आणि गार्ड गंभीर रित्या जखमी झाले आहेत. तर ओरीसातही एक सरकारी गोदाम उडवून दिले आहे.
Midnapore (PTI)
Four CRPF personnel were Wednesday killed and two injured in an IED blast triggered by Naxals at Lalgarh in eastern Indian state West Bengal on the second day of their bandh called in five states.
The blast comes a day after Union Home Minister P Chidambaram asked the Naxals to abjure violence and come for talks.
The Central Reserve Police Force men had set out from their camp at Goaltore market to patrol nearby villagers when the blast took place at Ramgarh in Lalgarh police station area in West Midnapore district at 1130 hrs.
"Four CRPF jawans and two were injured in an IED blast set off by Naxals," M Nageswar Rao, CRPF Inspector General of Police, Eastern Sector told.
Those killed included three constables besides the driver of the SUV in which they were travelling. The vehicle was badly damaged in the explosion.