'लैला' धडकले, तिघांचा मृत्‍यू

Posted on Wednesday, May 19, 2010 by maaybhumi desk

चेन्नई/भुवनेश्वर


बंगालच्‍या उपसागरात निर्माण झालेल्‍या लैला वादळाने आपले रौद्र रूप दाखवण्‍यास सुरूवात केली असून या वादळामुळे तामीलनाडुमध्‍ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेघर झाले आहेत. वादळाच्‍या पार्श्‍वभूमीवर किनारपट्टीवरील कन्याकुमारी, रामनाथपुरम आणि चेन्नईला सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.


चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्‍या किनारपट्टीच्‍या दिशेने सरकत असून जोरदार वादळाच्‍या शक्यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे. तर प्रशासनालाही सतर्कतेचे आदेश देण्‍यात आले असून कुठल्‍याही स्थितीवर नियंत्रणासाठी तयार राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.


जोरदार वादळ आणि पावसामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्‍याची शक्यता असून हवामान खात्याने वर्तविलेल्‍या शक्यतेनुसार लैला गुरूवारी सकाळपर्यंत आंध्रच्‍या किनारपट्टीवर धडकण्‍याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्‍या विशाखापट्टणम, मछलीपट्टनम, काकीनाडा, कलिंगपट्टणम, गंगावरमसह पाच बेटांवर दक्षतेचा इशारा देण्‍यात आला असून सर्वत्र यंत्रणा सज्ज झाल्‍या आहेत. लैलाच्‍या प्रभावामुळे आंध्र प्रदेशात मंगळवारी सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार वादळासह विजांचा कडकडाटही झाला.


Rains batter north TN as cyclone moves closer to coast

Chennai (PTI)


Heavy rains battered the coastal areas of north Tamil Nadu today as cyclone 'Laila' further intensified and moved to lay centred in the Bay of Bengal around 190 km east-northeast of Chennai and is expected to cross the Andhra Pradesh coast tomorrow.

The cyclonic storm over southwest and adjoining westcentral Bay of Bengal moved slightly northwards and lay centred at about 190 km east-northeast of Chennai at 5.30 AM, bringing heavy rains in several places, including the city, since last night, Met department officials here said today.

Fishermen have been advised not to venture into the sea.

The system is likely to intensify further and move in a northwesterly to northerly direction and cross Andhra coast between Ongole and Visakhapatnam by the early hours of tomorrow.

Cautionary signal No.7 (the highest intensity) has been hoisted in Kalingapattinam, Gangavaram, Kakinada, Visakapattinam, and Machillipattinam ports in Andhra Pradesh and No.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news
current news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner