बारावीचा निकाल 72.17 टक्के
मुंबई
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर झाला असून यंदा राज्याचा एकूण निकाल 72.17 टक्के लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल नाशिक बोर्डाचा 79.08 टक्के लागला असून सर्वांत कमी लातूरचा म्हणजेच 44.81 इतका आहे.
विभागवार निकालामध्ये कोल्हापूर 77.74, अमरावती 77.43, पुणे 77.20, औरंगाबाद 72.05, मुंबई 70.81, नागपूर 69.94 टक्के निकाल लागला आहे.
या वर्षापासून प्रथमच बारावीची संपूर्ण गुणपत्रिका वेबसाईटवरच पहायला मिळणार आहे. प्रत्यक्ष गुणपत्रिका चार-पाच दिवसांनी मिळणार आहे. संपूर्ण निकाल http://mahresult.nic.in/hsc2010/hsc10.htm या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.
यावर्षी हा निकाल ऑनलाईन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निकाल तयार असून, गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. ऑनलाईन निकाल जाहीर करून गुणपत्रिका चार-पाच दिवसांनी संबंधित महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले.