विमानाचे एमरजन्सी लँडींग म्हणजे काय?
Posted on Monday, May 24, 2010 by maaybhumi desk
जर एखाद्या विमानात उड्डाणानंतर काही बिघाड आढळून आला तर त्याला त्वरित जवळच्या विमानतळावर उतरविले जात असते. यासाठी एक खास पद्धत वापरली जाते. विमानाची एमरजन्सी लँडिंग करण्यापूर्वी हवेतच त्याचे इंधन कमी केले जाते.
विमानात केवळ आवश्यकते इतकेच इंधन ठेवले जाते, असे केल्याने विमानाचे वजन कमी होते. तसेच आग लागण्याची शक्यताही कमी होते. विमानतळावर खबरदारीचे उपाय म्हणून आगीपासून लढण्यासाठी सर्व व्यवस्था केल्या जातात. जर विमान लहान असेल तर रनवेवर कुशनची व्यवस्था केली जाऊ शकते. त्यानंतर 
विमानाची गती कमी करून त्याला धावपट्टीवर उतरविले जाते. 
टायर फुटल्यानंतर किंवा तुटल्यानंतर लँडिंग 
विमानाचा टायर फुटला किंवा चाक निखळून असडले असल्यास सर्वांत आधी त्यातील इंधन कमी केले जाते. रनवेवर आगीपासून बचावासाठी सर्व व्यवस्था सज्ज ठेवल्या जातात. त्यानंतर त्याची बॅली लँडिंग म्हणजे विमान पोटाच्या आधारे जमीनीवर उतरवले जाते. यावेळी जमीनीवर विमानाच्या वेगा इतक्याच वेगाने एक मजबूत गाडी चालविली जाते. विमान हळूच त्या गाडीवर उतरविल्यानंतर गाडी काही दूर जाऊन हळूहळू थांबविली जाते.
देशभरात केवळ तीन ठिकाणी आपात लँडींग
विमानाच्या उड्डाणानंतर तांत्रिक अडचण आल्यास त्याला जवळच्या विमानतळावर उतरवले जात असले तरीही देशभरात केवळ आग्रा, दिल्ली आणि मुंबई शहरात अशा प्रकारच्या लँडिंगची सोय आहे.
 
 
 
