वेदनेची संवेदना (गज़ल)
Posted on Monday, May 24, 2010 by maaybhumi desk
एवढे आले की मज दु:ख आवडाया लागले
अन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)
रोज मी वेदनेला कुरवाळाया लागलो
अन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)
वेदना शमताच पुन्हा जागवाया लागलो
वेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)
वेदनेची वासना जेव्हा वाढावया लागली
परमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)
सुख अव्हेरून वेदना कवटाळाया लागलो
श्रृंगारासम वेदना भोगावया लागलो (५)
वेदनेच्या नसण्याने व्याकुळ व्हाया लागलो
प्रार्थनेत ही वेदनेची याचना कराया लागलो (६)
वेदनेच्या संवेदनेने बेभान व्हाया लागलो
वेदनेचे हलाहल लीलया पचवाया लागलो (७)
वेदनेच्या धुंदीत जेव्हा झिंगाया लागलो
मदिरेसम वेदना तेव्हा प्यावया लागलो (८)
फ़क्त वेदनाचं शाश्वत मानावया लागलो
वेदना सखी-सोबती सर्वां सांगावया लागलो (९)
वेदना अमूल्य/अलौकिक मानावया लागलो
वेदनेला इतरांपासून लपवाया लागलो (१०)
दुस-यांच्या वेदनेची आस धराया लागलो
त्यांच्या वेदनेला (ही) आपली मानावया लागलो (११)
अन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)
रोज मी वेदनेला कुरवाळाया लागलो
अन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)
वेदना शमताच पुन्हा जागवाया लागलो
वेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)
वेदनेची वासना जेव्हा वाढावया लागली
परमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)
सुख अव्हेरून वेदना कवटाळाया लागलो
श्रृंगारासम वेदना भोगावया लागलो (५)
वेदनेच्या नसण्याने व्याकुळ व्हाया लागलो
प्रार्थनेत ही वेदनेची याचना कराया लागलो (६)
वेदनेच्या संवेदनेने बेभान व्हाया लागलो
वेदनेचे हलाहल लीलया पचवाया लागलो (७)
वेदनेच्या धुंदीत जेव्हा झिंगाया लागलो
मदिरेसम वेदना तेव्हा प्यावया लागलो (८)
फ़क्त वेदनाचं शाश्वत मानावया लागलो
वेदना सखी-सोबती सर्वां सांगावया लागलो (९)
वेदना अमूल्य/अलौकिक मानावया लागलो
वेदनेला इतरांपासून लपवाया लागलो (१०)
दुस-यांच्या वेदनेची आस धराया लागलो
त्यांच्या वेदनेला (ही) आपली मानावया लागलो (११)
-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.
वाचण्यासारखे आणखीही काहीः
marathi
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh