बम बम बोले

Posted on Friday, May 14, 2010 by maaybhumi desk

बॅनर : संजय गोधावत ग्रुप, परसेप्ट पिक्चर कंपनी
निदर्शन : प्रियदर्शन
कलाकार : दर्शील सफारी, अतुल कुलकर्णी, रितुपर्णा सेनगुप्ता, जिया वस्तानी.


'बम बम बोले' हे चित्रपट इराणी फिल्म 'चिल्ड्रन ऑफ हेवन' याचे भारतीय संस्करण आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. मजीद मजीदीच्या या इराणी चित्रपटाला बरेचसे पुरस्कार मिळाले आहेत. 'तारे जमीं पर' चा बाल कलाकार दर्शील सफारी 'बम बम बोले' या चित्रपटात दिसणार आहे.

खोगीराम (अतुल कुलकर्णी) आपली पत्नी (रितुपर्णा सेनगुप्ता), मुलं पिनू (दर्शील सफारी) आणि रिमझिम (जिया) सोबत दहशतवाद्यांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात राहत आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती फारच खराब असते. आपल्या मुलांना मोठ्या शाळेत शिकवण्याची खोगीरामची इच्छा असते.

खोगीरामला मोठ्या शाळेच्या स्टँडर्ड प्रमाणे आपले जीवन चालवणे फारच अवघड जात असते. शाळेचे गणवेश आणि इतर वस्तू घेण्यासाठीही त्याच्या जवळ पैसे नसतात. परिस्थिती तेव्हा फारच वाईट होते जेव्हा पिनू भाजीच्या दुकानात रिमझिमचे बूट हरवून बसतो.

वडिलांना सांगण्याऐवजी ते दोघेही एकाच बुटाने काम चालवण्याचा निर्णय घेतात. अगोदर रिमझिम बूट घालून शाळेत जाते ती घरी परतल्यानंतर पिनू तेच बूट वापरतो.

शाळेत होणाऱ्या इंटरस्कूल मॅराथॉन स्पर्धेतील विजेत्या मुलाला शूज मिळणार असतात. पिनू या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतो.

पिनू आपल्या लहान बहिणीसाठी हे करू शकेल?
काय देव पिनूची मदत करेल?
काय खोगीरामचे दिवस बदलतील?


या सर्व गोष्टींचे उत्तरं तुम्हाला 'बम बम बोले'मध्ये जरूर मिळेल.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner