हस्सीच्‍या तडाख्‍याने पाकचा धुव्वा

Posted on Saturday, May 15, 2010 by maaybhumi desk

सेंट लूसिया

मायकल हस्सीच्‍या 24 चेंडुंवर नाबाद 60 धावांच्‍या निर्णायक षटकातील धडाकेबाज फलंदाजीमुळे अतिशय चुरशीच्‍या सामन्‍यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तीन गड्यांनी पराभव केला आहे. कंगारूंच्‍या या विजयामुळे आयसीसी ट्वेंटी-20 विश्‍व करंडकाच्‍या अंतिम सामन्‍यात पोचले असून दुसरे टी-20 विजेतेपद मिळवण्‍याच्‍या पाकच्‍या अपेक्षा धुळीस मिळाल्‍या आहेत.



पाकच्‍या 192 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करण्‍यासाठी मैदानावर उतरलेल्‍या ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी निर्णायक क्षणी ढेपाळल्‍याने संघाची अवस्‍था पराभवाकडे झुकत असताना आणि अखेरच्‍या 18 चेंडुंवर 48 धावांची आवश्‍यकता असताना हस्सीने तूफानी फलंदाजी करत अखेरच्‍या षटकात धावांचा पाऊस पाडला. हस्सीच्‍या चौकार आणि षटकारांच्‍या पावसात पाकच्‍या अपेक्षा वाहून गेल्‍या. आता अंतिम सामन्‍यात ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे. इंग्लडने आधीच सेमीफायनलमध्‍ये श्रीलंकेचा सात गड्यांनी पराभव केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

latest news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner