व-हाडाच्‍या बसवर वीज तार पडून 30 ठार

Posted on Friday, May 14, 2010 by maaybhumi desk

मंडला

लग्नाचे व-हाडी नेत असलेल्‍या बसवर अती उच्‍चदाबाची वीज तार पडून झालेल्‍या अपघातात सुमारे 30 जण ठार झाल्‍याची माहिती सुत्रांनी दिली असून यात अनेक जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

याबाबत माहितीनुसार मध्‍य प्रदेशातील पिंडरई या आदिवासी बहुल भागातून मंडलाकडे लग्नकार्यासाठी जात असलेल्‍या बसवर कन्हर गावाजवळ अती उच्‍चदाबाची वायर पडल्‍याने अचानक आग लागली. तसेच करंट पसरल्‍याने 30 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या बसमध्‍ये सुमारे 40 जण असल्‍याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून मदत कार्यासाठी शहरातून रुग्णवाहिका व बचाव पथक रवाना झाले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

latest news
national news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner