शेर्लिन न्‍यूड पोज देणार

Posted on Friday, May 14, 2010 by maaybhumi desk

आपल्‍या मदमस्‍त अदांनी अनेकांना घायाळ करणारी बिनधास्‍त गर्ल शेर्लिन चोपडा आता न्‍यूड फोटो शूटसाठी पोज देणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरुषांच्‍या प्रसिद्ध प्लेब्वॉय या मासिकाने तिला कव्‍हर गर्लसाठीचा प्रस्‍ताव पाठविला असून तिने तो स्‍वीकारला आहे.

या मासिकाच्‍या कव्‍हरवर न्‍यूड पोज देणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरणार आहे. शेर्लिनच्‍या अमेरीकन एजंटने तिचे काही फोटो या मासिकाच्‍या मुख्‍य छायाचित्रकारास पाठविले होते. ते पाहून त्याने तिला प्रस्‍ताव पाठविला आहे. तो तिने स्‍वीकारला किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसली तरीही शेर्लिनने यासाठी तयारी सुरू केली आहे.


याबाबत शेर्लिनने दिलेल्‍या माहितीनुसार तिने अद्याप एकही न्‍यूड सीन दिलेले नसल्‍याने तिला ते करायला नक्कीच आवडेल. बिकिनी घालणे आणि न्यूड शॉटस् देणे यात बराच फरक आहे. प्लेब्वॉयच्‍या ऑफर नंतर तिने आपल्‍या एका मित्र फोटोग्राफरकडून न्‍यूड फोटोसाठी टेस्ट शूट करून घेतला आहे. या माध्‍यमातून ती आपण किती सहजपणे हे करून शकू हे पडताळून पाहणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner