देशभरात उन्‍हामुळे जनजीवन विस्‍कळीत

Posted on Wednesday, May 26, 2010 by maaybhumi desk

गेल्‍या काही दिवसांपासून देशभरात उन्‍हाने हाहाकार माजविला असून आतापर्यंत उष्‍माघाताने देशभरात सुमारे 225 जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिना संपत असताना उन्‍हाबरोबर उष्‍णवारेही धोकादायक ठरत आहेत. राज्‍यात सर्वाधिक तापमान जळगाव जिल्‍ह्यात नोंदविण्‍यात आले असून जिल्‍ह्यातील फैजपूरमध्‍ये तर ते 49.4 पर्यंत पोचले आहे.

केरळ आणि तमिलनाडुमध्‍ये तुरळक सरी कोसळल्‍यामुळे आणि पश्चिम बंगाल, सिक्किम, झारखंड आणि बिहारमध्‍ये तापमानात काही अंशाची झालेली घसरण वगळता देशभरात सुर्यदेवाने जोरदार तडाखा दाखवला आहे. राजस्थान, महाराष्‍ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, छत्तीसगढ, गुजरात आणि उत्तर प्रदेशात उन्‍हामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले असून एकट्या गुजरातमध्‍ये उष्‍माघाताने किमान 140 जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्‍यप्रदेशातील ग्वालियरमध्‍ये उष्‍माघाताचा तडाखा बसल्‍याने सीआरपीएफच्‍या 3 जवानांचा मृत्यू झाला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner