जगातील सर्वात उष्ण ठिकाणे
भारतात यंदा उन्हाने आजवरच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आजवरच्या ज्ञात वर्षांतील तापमानाचा उच्चांक गाठला आहे. राजस्थानातील काही भागांमध्ये आणि महाराष्ट्रातही फैजपूरला तापमान 49 अंशाच्या पलीकडे गेले आहे. उन्हाच्या या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असले तरीही जगातील काही भागांमध्ये तापमानाने यापेक्षाही मोठे रेकॉर्ड कायम केले आहे.
पाहूया जगातील सर्वाधिक उष्ण शहरे आणि तेथील आजवरचे सर्वाधिक तापमानः
अल अजीजियाह (आफ्रीका)- 57.8 - 13 सप्टेंबर 1922
वंदा स्टेशन (अंटार्क्टीका) - 51 - 1 मे 1974
तिरात तिव (इस्त्राईल, आशिया)- 53.9 - 21 जून 1942
एथेंस (ग्रीस, युरोप) - 48 डिग्री - 10 जुलै 1976
डेथ व्हॅली (उत्तर अमेरीका) - 56.7 - 10 जुलै 1913
व्हीला डी मारिया (दक्षिण अमेरिका) - 49.1 - 2 जानेवारी 1920
ओडनाडट्टा (ऑस्ट्रेलिया) - 50.7 - 2 जानेवारी 1960