विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

Posted on Wednesday, May 26, 2010 by maaybhumi desk

प्रत्येक विमानाच्‍या मागील भागात बसवलेला फ्लाइट डाटा रेकॉर्डर (एफडीआर) किंवा ब्लॅक बॉक्स सर्वांत महत्‍वाचा भाग समजला होता. या उपकरणाच्‍या मदतीने विमानाच्‍या अपघाताच्‍या कारणांचा शोध लावणे सोपे जात असते.

विमानाच्‍या मागील पंखामध्‍ये बसविण्‍यात आलेल्‍या या उपकरणाचा रंग नारंगी असून त्‍यातून अनेक बाबींवर प्रकाश टाकणे सोपे होत असते. आतापर्यंत झालेल्‍या अपघातांमध्‍ये विमानाचा मागील भाग ब-याचदा सुरक्षित असल्‍याचे दिसून आले आहे. त्‍यामुळे हे उपकरण मागे लावण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

अतिशय कठोर आवरणांनी बनविलेल्‍या या उपकरणास अतिशय सुरक्षित रित्या लावले जात असते. त्यावर अनेक आवरणे असल्‍याने अपघाताच्‍या वेळी आग आणि प्रतिकूल स्थितीत त्याचे रक्षण व्‍हावे यासाठी हे लावले जात असते.

त्यामुळे अतिउष्‍णतेचा किंवा पाण्‍याचाही त्यावर फरक पडत नाही. समुद्रात तो 6000 हजार फूटांवर पाण्‍याखाली सुरक्षित राहू शकते.


विमानाच्‍या महत्वाच्‍या उपकरणांध्‍ये कॉकपिटमध्‍ये बसविलेले व्‍हाईस रिकॉर्डरही (सीव्‍हीआर) महत्‍वाचा असतो.  हे उपकरण कॉकपिटच्‍या आवाजा व्‍यतिरिक्त रेडियो ट्रांसमिशनही रेकॉर्ड करीत असते. 

विमान अपघातातील कारणांचा शोध लावण्‍याच्‍या उद्देशाने मेलबोर्नच्‍या एअरोनॉटिकल रिसर्च लॅबोरेट्रीजच्‍या डेव्‍हीड वॉरेन याने 1953 मध्‍ये ब्लॅक बॉक्सचा शोध लावला.

अपघाताच्‍या वेळी हा बॉक्स सहज सापडावा यासाठी त्याचा रंग लाल किंवा नारंगी ठरविण्‍यात आला आहे. 1960 मध्‍ये ऑस्ट्रेलियाने आपल्‍या विमानांमध्‍ये ब्लॅक बॉक्स लावणे सक्तीचे केले. भारतात नागरी विमानन महासंचलनालयाच्‍या नियमांनुसार एक जानेवारी 2005 पासून सर्व विमाने आणि हेलिकॉप्टरमध्‍ये सीव्‍हीआर आणि एफडीआर लावणे सक्तीचे करण्‍यात आले आहे.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner