झारखंडः पहिला मुख्यमंत्री भाजपचा
Posted on Tuesday, May 18, 2010 by maaybhumi desk
रांची
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा आता सुटला असून आधी भाजप आणि नंतर झामुमोचा मुख्यमंत्री 28-28 महिन्यांसाठी असणार आहे. भाजपतर्फे अर्जुन मुंडा यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले आहे. विद्यमान मुख्यमंत्री शिबू सोरेन येत्या 25 मे रोजी राजीनामा देतील. त्यानंतर मुंडा पदभार स्वीकारणार आहेत.
शिबू सोरेन व भाजपचे नेते व आगामी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दोन्ही पक्ष विधानसभेच्या उर्वरित 56 महिन्यांच्या काळात 28-28 महिने सरकार चालविणार आहेत. त्यानुसार आधी भाजपचे अर्जुन मुंढा आणि नंतर शिबू सोरेन हे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.