चक्रीवादळापासून बचावासाठी 472 कोटींची तरतुद

Posted on Wednesday, June 02, 2010 by maaybhumi desk

गांधीनगर

गुजरातच्‍या किनारपट्टीच्‍या दिशेने सरकत असलेल्‍या वादळापासून बचावासाठी सरकारने पुरेशा उपाय योजना झाल्‍याचा दावा केला असून राज्‍य सरकारने यासाठी 472 कोटी रुपये खर्चुन एक योजना तयार केली आहे. यासह गुजरातच्‍या प्रमुख चार शहरांमध्‍ये पूर रोखण्‍यासाठी व विस्‍थापितांना आसरा देण्‍यासाठी खाजगी शाळांमध्‍येही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

महसूल विभागाच्‍या अधिका-यांनी याबाबत दिलेल्‍या निर्णयानुसार गुजरात सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्टच्‍या (जीसीआरएमपी) पहिल्‍या टप्‍प्‍यात पायाभूत सुविधा उभारणे, संपर्कासाठीची पर्यायी व्‍यवस्‍था उभी करण्‍यासह असलेल्‍या व्‍यवस्‍थेत त्वरित दुरूस्‍ती करणे आणि आणिबाणीची घोषणा करण्‍यासाठीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

मॉन्‍सून दरम्यान गुजरातमध्‍ये सागरी वादळाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner