ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
नवी दिल्ली
सैन्यदलात इंजीनियर इन चीफ पदावर कार्यरत असलेल्या ले. जनरल ए.के. नंदा यांच्यावर सैन्यातच कार्यरत असलेल्या एका टेक्निकल सेक्रेटरीच्या पत्नीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार गेल्या महिन्यात इस्त्रायलच्या दौ-या दरम्यान त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या संदर्भात सैन्य दलाकडून प्रसारित करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार ले.जन. नंदा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून या आरोपांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचे सैन्यदलाचे म्हणणे आहे.
ले.जन. ए. के. नंदा आणि त्यांचे काही सहकारी कुटुंबासह इस्त्रायलच्या दौ-यावर गेले होते. त्या दरम्यान हा शोषणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार संबंधित महिलेने आर्मी वाइफ वेल्फेयर असोसिएशनच्या अध्यक्षा व सेना प्रमुखांच्या पत्नी भारती सिंह यांच्याकडे केली आहे. यानंतर भारती सिंह यांनी ती आपले पती व लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्या समोर मांडली.