'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश

Posted on Thursday, June 03, 2010 by maaybhumi desk

झारग्राम

तृणमूल काँग्रेसच्या मागणीपुढे मान तुकवित, अखेर केंद्र सरकारने ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या घातपाताच्या घटनेची केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून (सीबीआय) चौकशी करण्याचा आदेश जारी करण्‍यात आला आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनजी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्ञानेश्वरी घातपाताची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आपल्याला रेल्वे मंत्रालयातर्फे मिळाल्याचे बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. झारग्राम घातपाताच्या सीबीआय चौकशीला आधी विरोध करणार्‍या राज्य सरकारने आता या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

पश्चिम बंगाल सरकारकडून जोपर्यंत झारग्राम घातपाताच्या सीबीआय चौकशीची मागणी होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकार तसा आदेश देणार नाही, असे केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते. आता राज्य सरकारचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) व रेल्वे पोलिसांच्या मदतीने सीबीआय ज्ञानेश्वरी घातपाताची चौकशी करणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news
current news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner