ऒढ मिलनाची

Posted on Friday, June 04, 2010 by maaybhumi desk


ऒढ सागराची बांधही फोडीत गेली
मार्गातील सगळ्यांना आकंठ बुडवीत गेली ||१||

ती आस मुरारीची व्याकूळ बनवून गेली
अवखळ राधेतील वात्सल्‍य जागवून गेली ||२||

तृषार्थ चातकाची तृष्णा शमवून गेली
ती धार मृगाची तृप्त करून गेली ||३||

मिलनास पृथ्वीराजाच्या भारावून गेली
ती संयुक्ता अल्लड भांबावून गेली ||४||

ऒढ दिप्तीची वेड लावून गेली
पतंगास त्या सत्वरी जाळून गेली ||५||

वर्णन दमयंतीचे, नलास मोहून गेले
हंसास बिचा-या जीवनदान देऊन गेले ||६||

आकर्षण वसुंधरेचे आभाळास नमवून गेले
दोघांना दूर क्षितिजावर भेटवून गेले ||७||

स्वप्ने तुझी रात्र जागवून गेली
आस मिलनाची कविता स्फुरवून गेली ||८||

                                                      -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner