डॉ. मंदाकिनी आमटे 'वूमन ऑफ द ईयर'

Posted on Friday, June 04, 2010 by maaybhumi desk

मुंबई

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ.मंदाकिनी आमटे यांना आयएमसी लेडिज विंग 'वूमन ऑफ द ईयर' पुरस्कार गुरूवारी प्रदान करण्यात आला. इंडियन मर्चंटस् चेंबरच्या चर्चगेट येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ.मंदाकिनी आमटे यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम आणि मागास भागात आरोग्य सेवेचे केलेले कार्य सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. यावेळी बँकिंग आणि आर्थिक सेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रेणू कर्नाड यांना जाहीर झालेला पुरस्कार अंजली तारापोर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला.

यावेळी खासदार प्रिया दत्त, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांची भाषणे झाली. इंडियन मर्चंटस् चेंबर लेडिज विंगच्या अध्यक्षा शीला कृपलानी, अध्यक्षपदी निवड झालेल्या स्मिता दांडेकर, गुल कृपलानी आदी यावेळी उपस्थित होते.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

current news
latest news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner