ऐश्वर्याला टीबी?

Posted on Friday, February 19, 2010 by maaybhumi desk

सौंदर्याची खाण समजली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सध्या आजारी आहे. यामुळे बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन अस्वस्थ झाले आहे. ऐश्वर्याला पोटाचा टीबी झाला असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ऐश्वर्याला पोटाचा टीबी झाल्याने ती आई होऊ शकत नाही, कारण या आजारात प्रेग्नेंट राहणे धोकेदायक आहे, असे ही बोलले जात आहे.

ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनने ट्‍विटरवर ती आजारी आहे, असे गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र
तिला नेमके झाले तरी काय? यासंदर्भात मात्र त्याने मौन पाळले होते.

ऐश्वर्या 37 वर्षाची झाली आहे. आता तिने परिवार वाढविण्‍यास काहीच हरकत नसल्याचे बच्चन परिवाराचे म्हणणे आहे. मात्र आता ऐश्वर्या बरी झाल्यानंतरच तिला नेमके काय झाले आहे आणि ती प्रेग्नेंट राहिल किंवा नाही या प्रश्नांची उकल होईल, यात शंकाच नाही.
CO.CC:Free Domain

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




1 Response to "ऐश्वर्याला टीबी?"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner