मोदींविरुद्ध पुरेसे पुरावे नाही

Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदींविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाबाबत पुरेसे पुरावे नाही. केवळ चार आरोपांबाबत ललित मोदी यांना कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आयपीएल संघांची विक्रीत मोदींनी आर्थिक हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

ललित मोदी यांच्या 22 आरोप निश्चित करुन त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्या नोटीसीचे उत्तर देण्यासाठी मोदी यांनी बीसीसीआयकडून दहा कगदपत्रे मागितली होती. परंतु त्यापैकी केवळ चारच कागदपत्र बीसीसीआयने उपलब्ध करुन दिले. मोदींविरुद्धचे अन्य आरोप माध्यमांच्या वृत्तावरुन करण्यात आले आहे. त्यांना कोणताही आधार नसल्याचे वृत्त आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

cricket
IPL



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner