वर्ल्डकप: भारतीय महिला उपांत्य फेरीत

Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk


सेंट किट्स

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा पुरुष संघ उपांत्य फेरीत पोहचण्याची अपेक्षा 'जर...तर'वर असताना भारतीय माहिलांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेचा 71 धावांनी धुव्वा उडवून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक होते.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पूनम राऊन (12) लवकर बाद झाल्यावर सुलक्षणा आणि मिताली यांनी दुसर्‍या विकेटसाठी 63 चेंडूत 86 धावांची भागेदारी केली. भारताने निर्धारित 20 षटकात तीन गडी गमवित 144 धावा केल्या. त्यानंतर डायना डेव्हिडने 12 धावा देत ‍श्रीलंकेचे चार फलंदाज बाद केले. यामुळे श्रीलंकेला नऊ गडी गमवत 73 धावाच करता आल्या.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner