Showing posts with label गड किल्‍ले. Show all posts
Showing posts with label गड किल्‍ले. Show all posts

बाजीप्रभुंच्‍या पराक्रमाचा साक्षीदार पन्‍हाळा

महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा सिंहाचा वाटा आहे. शिवरायांच्या शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे कथन करणारा किल्ला म्हणून पन्हाळगडाकडे पाहिले जाते. किल्ल्याची उंची ही सुमारे ४०४० फूट आहे. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तुलनेत अधिक उंचावर असल्याने देशभरासह विदेशातील पर्यटकही येथे मोठ्या संख्‍येने भेट देत असतात.

शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आलेला हा किल्‍ला सुरवातीला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांच्या ताब्यात होता. 'पन्नग्रालय' या नावाने हा क‍िल्ला पूर्वी ओळखला जात होता. अफजलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1700 शतकात पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली परंतु अठराशेमध्ये किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात होता.

स्‍वराज्‍याचे तोरणः तोरणा

photo by: wikipedia
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांमध्ये तोरणा एक महत्त्वाचा किल्ला आहे. इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असे. या मावळातून कानंदी नावाची नदी वाहत असल्यामुळे या खोर्‍याला कानंद मावळ असे नाव मिळाले.

तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हा गाव आहे. पुणे ते वेल्हा हे अंतर साधारण साठ कि.मी. आहे. पुण्यातून कात्रज - शिवापूर - नसरापूर - वेल्हा असे जाता येते. पुणे ते वेल्हा अशा एस.टी.बसची सोय आहे. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. राजगड किल्ल्याकडून तसेच भट्टी या गावातूनही गड चढता येतो. परंतु वेल्हा येथून जाणे सोयीचे आहे.

Sinhagad In Rain


































शिवप्रताप राजाचा प्रतापगड

5962_mahasan नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते.

स्‍वराज्याची राजधानीः रायगड

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड `रायरी' या नावाने ओळखला जात असे.

मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या.

शिवछत्रपतींची आरती

- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या अंगचे सर्व गुण आणि सर्व शक्ती केवळ देशभक्तीच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकर सर्वप्रथम देशभक्त होते आणि नंतर महाकवी, समाजसुधारक, लिपीसुधारक, रणझुंजार नेते होते.

सावरकरांचे हे जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या बालपणापासूनच स्पष्ट होत होते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात आर्य संघ या नावाच्या भोजन संघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हटली जावी म्हणून सावरकरांनी श्री शिवाजी महाराजांची आरती लिहिली.

आमनेरचा किल्ला

4705_Mahas आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा एक अपरिचित असा किल्ला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला आमनेरचा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मोडतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये हा किल्ला आहे.

पुरंदर

4243_Mahasans पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर नावाचा तालुका आहे. तालुक्याचे गाव सासवड आहे. पुरंदर हे तालुक्याचे नाव पुरंदर या किल्ल्यामुळेच रुढ झालेले आहे. सासवड पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. येथून पुरंदर किल्ला १५ किलोमीटर आहे. पुणे-पंढरपूर या मार्गावर सासवड आहे.

अजिंक्य पारगड

4589_Pargad सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगड तालूका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो.
चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्‍यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.

सिंधुदुर्ग किल्ला

5878_mahasanskriti छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी

कान्‍होजींच्‍या कारकीर्दीचा साक्षीदारः सुवर्णदुर्ग

1644100118145724624 महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न अशा कोकणच्या किनारपट्टीवर मोठ्या दिमाखात सुवर्णदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग उभा आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली या तालुक्यामध्ये आहे. दापोली पासून १६ कि.मी. अंतरावर हर्णे बंदर आहे. हर्णे बंदराच्या सागरात सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे.

बाळापूर किल्ला

विदर्भातील अकोला हा महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महीषी या नद्यांच्या संगमावर बाळापूर वसलेले आहे. जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर असून ते बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.

मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याश्या उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे.

कांचनगड

नाशिक जिल्ह्यात दुर्गांची संख्या मोठी आहे. हे दुर्ग गिरीदुर्ग प्रकारात मोडणारे असल्यामुळे बेलाग आहेत. यातील अनेक दुर्ग एकेका डोंगर रांगेमध्ये असल्यामुळे दुर्गांची साखळीच तयार झाली आहे. नाशिक शहराच्या उत्तरेकडे भौगोलिकदृष्टया अतिशय महत्त्वाची अशी अजंठा-सातमाळा ही डोंगररांग आहे. या डोंगर रांगेची सुरवात अचला नावाच्या किल्ल्यापासून होते. या पूर्व-पश्चिम पसरलेल्या रांगेत अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत.

किल्ले अचला

नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून अजंठा-सातमाळा ही सह्याद्रीची एक उपरांग पुर्वपश्चिम अशी पसरली आहे. या पूर्वपश्चिम पसरलेल्या रांगेमधे अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत. या गिरीदुर्गाच्या मालिकेमधे नामवंत दुर्गांबरोबरच काही अपरिचित दुर्गही सामावलेले आहेत.


अजंठा-सातमाळा रांगेची सुरवात होते. अचला नावाच्या किल्ल्यापासून. रांगेच्या सर्वात पश्चिमेकडे असणार्‍या अचला किल्ल्याला नाशिकमधून राज्य परिवहनच्या बसेसची सोय आहे. नाशिक ते सापुतारा अशा बसेस
धावतात.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner