Showing posts with label national news. Show all posts
Showing posts with label national news. Show all posts

एक पिज्‍जा = 12000 लीटर पाणी


नवी दिल्‍ली

सध्‍याच्‍या काळात पिज्जा न आवडणारी व्‍यक्ती शोधून सापडणे तसे कठीणच, पण तुम्हाला हे माहिती आहे का? की एक किलो पिज्जा बनविण्‍यासाठी 12000 लीटर पाणी लागत असते. तर तुमच्‍या आवडत्‍या ब्रेडच्‍या एका स्लाइससाठी 40 लीटर पाणी वापरले जाते. थांबा हा आकडा इथेच थांबत नाही, तर सहज मुड आला म्हणून तुम्ही पीत असलेल्‍या एका लीटर बीयरच्‍या निर्मितीसाठी 300 लीटर पाण्‍याची नासाडी केली जाते.

मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्‍या यादीत


नवी दिल्ली

उत्तर प्रदेशात चौकाचौकात आपले पुतळे स्‍थापन करण्‍याचा सपाटा लावलेल्‍या मुख्यमंत्री मायावती यांच्‍या पुतळ्याचा जगातील सर्वांत कुरूप पुतळ्यांमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे. एका आंतरराष्‍ट्रीय मासिकाने केलेल्‍या सर्व्‍हेक्षणानंतर ही आकडेवारी जाहीर करण्‍यात आली आहे.

'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश

झारग्राम

तृणमूल काँग्रेसच्या मागणीपुढे मान तुकवित, अखेर केंद्र सरकारने ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या घातपाताच्या घटनेची केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून (सीबीआय) चौकशी करण्याचा आदेश जारी करण्‍यात आला आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनजी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्ञानेश्वरी घातपाताची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आपल्याला रेल्वे मंत्रालयातर्फे मिळाल्याचे बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. झारग्राम घातपाताच्या सीबीआय चौकशीला आधी विरोध करणार्‍या राज्य सरकारने आता या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले

बुद्धदेव यांनी मुख्‍यमंत्रीपद सोडावेः ममता
कोलकाता

कोलकाता महानगर पालिकेच्‍या 141 जागांसाठी झालेल्‍या निवडणुकीत रेल्‍वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्‍या तृणमूल कॉंग्रेसने 95 जागांवर ताबा प्रस्‍थापित केला असून डाव्‍या आघाडीचा क्लीन स्‍वीप केला आहे. सीपीएमला केवळ 33 जागांवर समाधान मानावे लागले असून कॉंग्रेसने 10 व उर्वरितांनी सहा जागा जिंकल्‍या आहेत.

देशभरात उन्‍हामुळे जनजीवन विस्‍कळीत

गेल्‍या काही दिवसांपासून देशभरात उन्‍हाने हाहाकार माजविला असून आतापर्यंत उष्‍माघाताने देशभरात सुमारे 225 जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिना संपत असताना उन्‍हाबरोबर उष्‍णवारेही धोकादायक ठरत आहेत. राज्‍यात सर्वाधिक तापमान जळगाव जिल्‍ह्यात नोंदविण्‍यात आले असून जिल्‍ह्यातील फैजपूरमध्‍ये तर ते 49.4 पर्यंत पोचले आहे.

...असा झाला सीआरपीएफवर हल्‍ला

नक्षली कमांडरने दिलेली माहिती

दंतेवाडा

छत्तीसगडच्‍या दंतेवाडा येथे हरवलेल्‍या वायरलेस सेटमुळेच नक्षली हल्‍ल्‍यात 76 जवानांचा बळी गेल्‍याची नवीन माहिती समोर आली आहे. या हल्‍ला प्रकरणी अटक केलेल्‍या नक्षलवाद्यांच्‍या एका मुख्‍य कमांडरनेच ही माहिती दिली आहे. रविवारी या हल्‍ल्‍यात सहभागी असलेल्‍या नक्षली कमांडर बारसे लखमासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोमवारी पत्रकार परिषदेत लखमाने याबाबत सांगितले, की हरवलेल्‍या वायरलेस सेटचा शोध घेण्‍यासाठी जवान जंगलात परतले आणि एंबुशमध्‍ये फसले. ज्यावेळी नक्षली हल्‍ला झाला त्यावेळी अनेक जण झोपेत होते. चेह-याने अतिशय गरीब दिसणा-या जनमिलिशिया कमांडर बारसे लखमाची या हल्‍ल्‍यात महत्‍वाची भूमिका होती.

स्‍पाईस जेटच्‍या विमानाचे एमर्जन्‍सी लँडींग

195 प्रवाशांचे प्राण तासभर अधांतरी

नवी दिल्ली


दिल्लीहून श्रीनगरकडे जात असलेल्‍या स्पाइस जेटच्‍या एका विमानाच्‍या उड्डाणानंतर त्याचे टायर फुटल्‍याची शक्यता वर्तविली जात असून यामुळे विमानाची एमर्जन्‍सी लँडींग करण्‍यात आली आहे. विमानाचे टायरच फुटल्‍याने सर्व तपासण्‍या केल्‍यानंतरच ते प्रत्यक्षात धावपट्टीवर उतरविण्‍यात आले असून दिल्ली विमानतळावर आणिबाणीची घोषणा करण्‍यात आली होती. या विमानात 195 प्रवाशी होते.

नक्षलवाद व विमान अपघात नैतिक जबाबदारी माझीः पंतप्रधान

नवी दिल्ली

देशाचा पंतप्रधान या नात्याने मी संसदेला आणि लोकांना उत्तर देण्‍यास बांधील आहे. दंतेवाडातील नक्षलवादी हल्‍ला असो किंवा मंगळूरमध्‍ये झालेला विमान अपघात या सर्व घटनांना नैतिक दृष्‍ट्या मी जबाबदार आहे. देशासमोर यासारखी अनेक आव्‍हाने आहेत आणि ती सोडवण्‍यासाठी आम्हाला अधिक प्रभावीपणे काम करण्‍याची गरज आहे. भविष्‍यात अशा प्रकारच्‍या घटना घडू नये यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राष्‍ट्रीय पातळीवरील पत्रपरिषदेत दिले.

पाककडून सीमेवर रॉकेट हल्‍ला

जम्मू

पाकिस्तानी सुरक्षा दलाने रविवारी नियंत्रण रेषेवर शस्‍त्रसंधीचे पुन्‍हा एकदा उल्लंघन केले असून जम्मू व काश्मीरच्‍या  पुंछ जिल्‍ह्यातील मेंधर भागातील कृष्णा खो-यात गोळीबार केला आहे. भारतीय सैन्‍यानेही यास प्रत्युत्तर दिल्‍यानंतर पाककडून रॉकेटचा मारा करण्‍यात आल्‍याचे सुत्रांनी सांगितले.

जम्मूपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या पुंछमध्‍ये पाकिस्तानी सुरक्षा दलाने भारतीय ठिकाणांवर गोळीबारी केला असून या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. या घटनेनंतर भारतीय सैन्‍यानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामुळे बिथरलेल्‍या पाकी सैनिकांनी रॉकेटचा मारा सुरू केल्याची तक्रार संरक्षण दलाच्‍या सुत्रांनी केली आहे.

विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला

मंगळूर

एअर इंडिया एक्सप्रेसच्‍या अपघातग्रस्‍त विमानातून व्‍हाईस रेकार्डर (सीपीआर) आणि फ्लाइट डाटा रेकार्डर
(एफडीआर) सापडले आहेत. यामुळे अपघाताच्‍या कारणांचा शोध लावणे शक्य होणार आहे. या अपघातात चालक दलाच्‍या सदस्‍यांसह 158 जणांचा मृत्यू झाला आहे.

सीव्‍हीआरमध्‍ये कॉकपिटच्‍या आत झालेले संभाषण आणि पायलट व एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्‍यातील संभाषण आहे. ब्लॅकबॉक्स नावाने ओळखल्‍या जाणा-या या उपकरणात तांत्रिम माहिती असते.

नक्षलींविरोधात सैन्‍याची तयारी सुरू

रायपूर


नक्षलींचा गढ बनत चाललेल्‍या छत्तीसगढमध्‍ये सैन्‍य दलाचे सब एरिया मुख्यालय उघडण्‍यात आले असून सैन्‍याच्‍या मध्य कमांडने येथे ब्रिगेडियर कृष्णन ए. यांची नियुक्ती केली आहे. हे पाऊल नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी संभाव्‍य कारवाई म्हणून पाहिली जात आहे.


नुकत्याच राज्याच्‍या दौ-यावर आलेल्‍या सैन्‍याच्‍या मध्यभारत एरियाचे जनरल ऑफीसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल व्‍ही.के. धल्ल यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली आहे. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार धल्ल 28 किंवा 29 मे रोजी रायपूरमध्‍ये येण्‍याची शक्यता आहे.

भाजपची साथ सोडून गुरूजी कॉंग्रेसकडे!

रांची

झारखंडमध्‍ये आपले मुख्‍यमंत्रीपद वाचवण्‍याच्‍या प्रयत्नात असलेले झामुमो सुप्रिमो शिबू सोरेन आता भाजपची साथ सोडून कॉंग्रेसकडे सरकले असून राज्यात स्थिर सरकार बनवण्‍यासाठी त्‍यांनी कॉंग्रेसशी चर्चा सुरू केली आहे.

याबाबत सोरेन यांनी स्‍पष्‍ट केले आहे, की राज्यात स्थिर सरकार बनविण्‍यासाठी आम्ही युपीए सोबत चर्चा करत असून जी आघाडी आम्हाला स्थिर सरकार बनविण्‍यास मदत करेल आम्ही त्‍यांच्‍या मदतीने सरकार स्‍थापन करू.

मंगळूरः विमान अपघातातात 163 जणांचा मृत्‍यू

मंगळूर

दुबईहून मंगळूरकडे येत असलेले एअर इंडिया एक्‍सप्रेसचे बोईंग विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरून शेजारच्‍या दरीत कोसळल्‍याने झालेल्या अपघातात विमानातील 163 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 137 प्रौढ, 19 बालके व चार नवजात बालकांसह आणि चालक दलाचे सहा सदस्य होते.

अफजलची फाईल दुरूस्‍तीनंतर उपराज्‍यपालांकडे

नवी दिल्ली

दिल्‍ली सरकारने संसदेवरील हल्‍ल्‍याचा दोषी अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्‍याचे समर्थन केले असून अफजलने राष्‍ट्रपतींकडे केलेल्‍या दयेच्‍या अर्जावर आपला अभिप्राय नोंदवून दिल्‍ली सरकारने तो उपराज्‍यपाल तेजेंद्र खन्‍ना यांच्‍याकडे बुधवारी परत पाठवला आहे. उपराज्‍यपालांनी कायदा सुव्‍यवस्‍थेबाबत राज्‍य सरकारचे मत जाणून घेण्‍यासाठी मंगळवारी दिलेली फाईल राज्य सरकारकडे परत पाठवली होती.

नक्षलींचा हिंसक बंद, 4 जवान शहीद

कोलकाता

पश्चिम बंगालच्‍या पश्चिम मिदनापुर येथे झालेल्‍या एका भू-सुरुंगाच्‍या स्‍फोटात सीआरपीएफचे 4 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी पेट्रोलिंगवर जात असलेल्‍या जवानांच्‍या एका गाडीला या स्फोटांनी उडवून दिले आहे. सीआरपीएफ

जवान गाडीने गस्‍तीवर जात असताना रस्‍त्‍यावर लँडमाइन स्‍फोटात चार जवानांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आहेत.

'लैला' धडकले, तिघांचा मृत्‍यू

चेन्नई/भुवनेश्वर


बंगालच्‍या उपसागरात निर्माण झालेल्‍या लैला वादळाने आपले रौद्र रूप दाखवण्‍यास सुरूवात केली असून या वादळामुळे तामीलनाडुमध्‍ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेघर झाले आहेत. वादळाच्‍या पार्श्‍वभूमीवर किनारपट्टीवरील कन्याकुमारी, रामनाथपुरम आणि चेन्नईला सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.


चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्‍या किनारपट्टीच्‍या दिशेने सरकत असून जोरदार वादळाच्‍या शक्यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे. तर प्रशासनालाही सतर्कतेचे आदेश देण्‍यात आले असून कुठल्‍याही स्थितीवर नियंत्रणासाठी तयार राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

झारखंडः पहिला मुख्यमंत्री भाजपचा

रांची

गेल्‍या काही दिवसांपासून सुरू असलेला झारखंडच्‍या मुख्‍यमंत्रीपदाचा तिढा आता सुटला असून आधी भाजप आणि नंतर झामुमोचा मुख्‍यमंत्री 28-28 महिन्‍यांसाठी असणार आहे. भाजपतर्फे अर्जुन मुंडा यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्‍यात आले आहे. विद्यमान मुख्‍यमंत्री शिबू सोरेन येत्‍या 25 मे रोजी राजीनामा देतील. त्‍यानंतर मुंडा पदभार स्‍वीकारणार आहेत.

दंतेवाडा: नीमलष्‍कराचे अभियान सुरू, हायअलर्ट

रायपूर

छत्तीसगढच्‍या दंतेवाडा जिल्‍ह्यात नक्षलवाद्यांक‍डून केल्‍या जात असलेल्‍या भू-सुरूंग स्फोटानंतर जंगलात तपासणी अभियान सुरू करण्‍यात आले असून नक्षलींच्‍या दोन दिवसांच्‍या घोषणेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मंगळवारी घटनास्थळ आणि त्या परिसरात मोठ्या संख्‍येने पोलीस दल तैनात केले असून हल्‍लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

दंतेवाडाः नक्षलींनी बस उडवली, 50 ठार

दंतेवाडा

छत्तीसगडच्‍या दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी एका प्रवासी बसवर आयईडीचा वापर करून घडवून आणलेल्‍या स्‍फोटात 50 जण ठार झाले आहेत. मृतांमध्‍ये छत्तीसगडच्‍या काही विशेष पोलीस अधिका-यांचाही समावेश आहे. गेल्‍या महिन्‍यातील हा दुसरा मोठा स्‍फोट आहे.

दंतेवाडा जिल्‍ह्यातील गडीरास येथून भुसारसकडे ही बस चालली होती. नक्षलींनी यापूर्वी गावक-यांना पोलिसांसोबत प्रवास न करण्‍याची तंबी दिली आहे. मात्र ती पाळली न गेल्‍याने हा हल्‍ला घडवल्‍याचा दावा नक्षलींनी केला आहे.

अफजलची फाशी लांबण्‍यामागे दिल्‍ली सरकार!

नवी दिल्ली

मुंबई हल्‍ल्‍याचा आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्‍यात आल्‍यानंतर गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारकडे अफजल गुरुच्‍या फाशी संदर्भात माहिती मागविली आहे. संसदेवरील हल्‍ल्‍यातील आरोपी अफजल गुरूच्‍या फाशीची फाईल कधीपर्यंत अडकून पडणार आहे, अशी विचारणा गृहमंत्रालयाकडून दिल्ली सरकारकडे याबाबत पत्राद्वारे करण्‍यात आली आहे.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner