Showing posts with label cricket. Show all posts
Showing posts with label cricket. Show all posts

England makes slow but steady progress


      Zaheer, after scalping both wickets, hobbles off with an injury

India's troubles with starting tours continued here at Lord's on Thursday. Although there was some fine bowling, the fielding and the catching let India down. It ceded the honours of the first two sessions to England, which went to tea at 127 for two. Jonathan Trott, reprieved twice, was unbeaten on 58 and Kevin Pietersen, who didn't look entirely convincing, was on 22.What made it worse for India was the injury to its best bowler, Zaheer Khan. The extent and seriousness of the injury was unknown at the time of writing.Earlier, the start of the 2000th Test was held up a flimsy morning drizzle. With the pitch under cover — a posh hovercraft does duty here; canvas sheets are infra-dig — and the atmosphere heavy with moisture under cloudy skies, the toss wasn't straightforward.

या मातीत जन्‍मल्‍याचा मला अभिमान- सचिन

पुणे


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'मुंबई सर्वांचीच' या आपल्या विधानाचे 'प्रायश्चित्त' घेताना 'महाराष्ट्राच्या मातीत दम आहे', असे सांगून आपला महाराष्ट्राभिमान सार्वजनिकरित्या प्रकट केला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाप्रसंगी मराठीत मातीची मान उंचावणार्‍या मान्यवरांचा सत्कार केला. त्यावेळी ही संधी साधून सचिनने 'सिक्सर' मारला आहे.

कांगारूंचा पराभव, इंग्लंड टी-20 चॅम्पियन

ब्रिजटाऊन

बलाढ्य कांगारूंना पाणी पाजत अखेर अनेक वर्षांनी इंग्लंडने विश्वचषकावर आपले नाव कोरले. टी-20 फायनलमध्ये इंग्लंडच्या रेयान साइडबॉटम याच्या भेदक गोलंदाजीने तर क्रेग किसवेटरच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने टी-20 चॅम्पियन बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.

महिला T-20 वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्‍व

पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभव पत्करावा लागला असला तरीही ऑस्ट्रेलियन चाहत्यांची ही इच्‍छा महिला संघाने पूर्ण केली आहे. अतिशय चुरशीच्‍या या लढतीत ऑस्ट्रेलियन संघाने न्यूजीलँडचा 3 धावांनी पराभव क‍रीत महिला ट्वेंटी 20 वर्ल्ड कपचा पुरस्‍कार आपल्‍या नावे केला आहे.

हस्सीच्‍या तडाख्‍याने पाकचा धुव्वा

सेंट लूसिया

मायकल हस्सीच्‍या 24 चेंडुंवर नाबाद 60 धावांच्‍या निर्णायक षटकातील धडाकेबाज फलंदाजीमुळे अतिशय चुरशीच्‍या सामन्‍यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तीन गड्यांनी पराभव केला आहे. कंगारूंच्‍या या विजयामुळे आयसीसी ट्वेंटी-20 विश्‍व करंडकाच्‍या अंतिम सामन्‍यात पोचले असून दुसरे टी-20 विजेतेपद मिळवण्‍याच्‍या पाकच्‍या अपेक्षा धुळीस मिळाल्‍या आहेत.


मोदींविरुद्ध पुरेसे पुरावे नाही

नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदींविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाबाबत पुरेसे पुरावे नाही. केवळ चार आरोपांबाबत ललित मोदी यांना कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आयपीएल संघांची विक्रीत मोदींनी आर्थिक हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

वर्ल्डकप: भारतीय महिला उपांत्य फेरीत


सेंट किट्स

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा पुरुष संघ उपांत्य फेरीत पोहचण्याची अपेक्षा 'जर...तर'वर असताना भारतीय माहिलांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेचा 71 धावांनी धुव्वा उडवून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक होते.

भारताची सुपर 8 मध्‍ये धडक



सेंट लूसिया

दक्षिण अफ्रीकेचा 14 धावांनी पराभव करत भारताने सुपर 8 मध्‍ये आपले स्‍थान पक्के केले असून 187 धावांच्‍या अवघड आव्‍हानाचा सामना करायला उतरलेला दक्षिण अफ्रीकेचा संघ निर्धारित षटकात 5 गडी गमावून 172 धावाच करू शकला. 101 धावांची धमाकेदार खेळी करणारा सुरेश रैना सामनावीर ठरला.

न्‍यूझीलँडचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय

गयाना

टी-20 वर्ल्ड कपच्‍या पहिल्‍या सामन्‍यात न्यूजीलँडने श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. शेवटच्‍या चेंडुपर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्‍या या सामन्‍यात किवी संघाने एक चेंडु शिल्‍लक असताना विजय मिळवला.

येथील प्रोव्‍हीडन्‍स स्टेडियमवर झालेल्‍या सामन्‍यात विजयासाठी 136 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करीत असलेल्‍या  न्यूजीलँडच्‍या संघाला ब्रँडन मॅक्लमच्‍या रूपात पहिला धक्का बसला. त्‍यावेळी संघाने आपले खातेही उघडले नव्‍हते.

वेस्टइंडीजची विजयी सुरूवात

गयाना

वेस्टइंडीजने टी-20 वर्ल्ड कपच्‍या आपल्‍या पहिल्‍या सामन्‍यात शुक्रवारी आयरलँडचा 70 धावांनी मोठा पराभव
केला. सॅमीला अष्‍टपैलू खेळासाठी सामनावीराचा बहुमान मिळाला.

येथील प्रोविडेंस स्टेडियमवर यजमान वेस्टइंडीजने 20 षटकात नऊ गडी गमावून 138 धावा केल्‍या. यजमान
संघाकडून डरेन सॅमीने सर्वाधिक 30 धावा केल्‍या. तर आयरलँडच्‍या जॉर्ज डॉकरेलने तीन गडी बाद केले.

चिरायु अमीन आयपीएलचे हंगामी अध्‍यक्ष

मुंबई

आयपीएलमध्‍ये भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपांचा सामना करीत असलेल्‍या ललित मोदी यांना आयपीएल अध्‍यक्ष आणि कमीशनरपदावरून बडतर्फ केल्‍यानंतर या पदावर हंगामी अध्‍यक्ष म्हणून वडोदरा क्रिकेट असोसिएशनचे अध्‍यक्ष चिरायु अमीन यांची निवड करण्‍यात आली आहे. अमीन बीसीसीआयचे उपाध्‍यक्षही आहेत.

धोनीचा चेन्‍नई सुपर बनला आयपीएलचा 'किंग'


मुंबई

नवी मुंबईच्‍या डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्‍या गेलेल्‍या आयपीएल-3 च्‍या अंतिम सामन्‍यात महेंद्र सिंह धोनीच्‍या चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच क्षेत्रात सांघिक एकतेचे प्रदर्शन घडवत मुंबई इंडियन्‍सचा 22 धावांनी पराभव करून आयपीएल-3 चे विजेतेपद पटकावले आहे.



बैठकीपूर्वीच मोदी बरखास्‍त होणार!


नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयपीएल कमीशनर ललित मोदी यांना बरखास्‍त करण्‍याची तयारी पूर्ण केली असून मोंदीकडून बीसीसीआयला केल्‍या जात असलेल्‍या आव्‍हानाच्‍या पाश्‍वभूमीवर सोमवारी होणा-या गव्‍हर्निंग कौन्सिलच्‍या बैठकीपूर्वीच मोदींना बरखास्त केले जाण्‍याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार बीसीसीआय अध्‍यक्ष शशांक मनोहर अंतिम सामना संपताच मोदींना पदावरून दूर करणार आहेत.

मोदींच्‍या दबावानंतर पवारांचा बचावात्‍मक पवित्रा


मुंबई

आयपीएलमधील भ्रष्‍टाचाराची पाळेमुळे खोलवर रूतली असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले असून आपल्‍यावर राजीनाम्याचा दबाव आणण्‍याचा किंवा पदावरून दूर करण्‍याचा प्रयत्न झाल्‍यास आपण सर्वांचे पितळ उघडे करू अशी धमकी देणा-या ललित मोदींबाबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष आणि आयसीसीच उपाध्यक्ष शरद पवार यांनी अधिक नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र ती घेतानाही आपला आयपीएलशी काहीही संबंध नसल्‍याचा दावा त्‍यांनी पुन्‍हा एकदा केला आहे.

चॅलेंजर्स समोर डेक्कन फ्यूज

मुंबई

डेक्कन चार्जर्सच्‍या 82 धावांच्‍या सोप्‍या आव्‍हानाचा सामना करण्‍यासाठी उतरलेल्‍या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने 13.5 षटकातच सामना नऊ गड्यांनी जिंकला असून या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्सने या वर्षाच्‍या सप्‍टेंबरमध्‍ये होणा-या ट्वेंटी20 चॅम्पियन्‍स लीगसाठीची पात्रता मिळविली आहे.

आयपीएलमध्‍ये 'सहारा पुणे वॉरिअर्स'ची एन्‍ट्री

पुणे


इंडियन प्रीमियर लीगमध्‍ये नव्‍याने सहभागी झालेल्‍या पुणे फ्रॅंचाईजी संघाचे नाव सहारा पुणे वॉरिअर्स असे ठेवण्‍यात आले असून येथील स.प. महाविद्यालयाच्‍या प्रांगणात झालेल्‍या भव्‍य कार्यक्रमात संघाच्‍या नावाची घोषणा करण्‍यात आली. सहारा इंडिया परिवाराचे अर्ध्‍वयु सुब्रोतो रॉय ही घोषणा केली.

'शरदा'च्‍या चांदण्‍यातही मोदी 'होरपळले'!

नवी दिल्ली

आयपीएल फ्रेंचायजी प्रकरणातील घोटाळ्याच्‍या केंद्रस्‍थानी असलेल्‍या ललित मोदी यांना राजीनामा देण्‍याचे 'आदेश' बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असल्‍याची माहिती अंतर्गत सुत्रांनी दिली आहे. पवार गेल्‍या काही दिवसांपासून मोदींच्‍या बचावासाठी प्रयत्न करीत होते, मात्र आता प्रकरण हाताबाहेर गेल्‍याने आणि बीसीसीआयनेही याबाबत कठोर भूमिका घेतल्‍याने मोदींची गच्‍छंती अटळ झाली आहे.  

पवार, नीतीश कुमार यांचे फोन टॅप

नवी दिल्‍ली

केंद्र सरकारने केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, कॉंग्रेस नेता दिग्गविजय सिंह, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात आणि आयपीएल आयुक्त ललित मोदी यांचे फोन टॅपिंग केल्याचे वृत्त आहे. 'आऊटलूक'ने याबाबत वृत्त दिले आहे.

ललित मोदी 'नरमले'


मुंबई

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) पंगा घेण्याच्या तयारीत असलेल्या ललित मोदी यांनी यु-टर्न घेतला आहे. मोदींनी आपले पाऊल मागे घेत मला सर्व प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी पाच दिवसांचा तरी अवधी द्या, अशी विनंती बीसीसीआयला केली आहे. न्यायालयात जाण्याचा विचारही मोदींनी सोडून दिला आहे.

आयपीएल चौकशीसाठी संसदीय समितीची मागणी

संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहात गदारोळ

नवी दिल्ली

इंडियन प्रिमियर लीगमध्‍ये मोठ्या प्रमाणावर घोटाळ्याचे पुरावे हाती येत असून या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी सरकारने संयुक्त संसदीय समितीची स्‍थापना करावी अशी मागणी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी केली असून सरकारच्‍या चौकशीवर आपल्‍याला विश्‍वास नसल्‍याचे म्हटले आहे. विरोधकांच्‍या या मागणीमुळे संसदेत जोरदार गदारोळ सुरू असून त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकुब करावे लागले आहे.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner