चॅलेंजर्स समोर डेक्कन फ्यूज
Posted on Saturday, April 24, 2010 by maaybhumi desk
डेक्कन चार्जर्सच्या 82 धावांच्या सोप्या आव्हानाचा सामना करण्यासाठी उतरलेल्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने 13.5 षटकातच सामना नऊ गड्यांनी जिंकला असून या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्सने या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये होणा-या ट्वेंटी20 चॅम्पियन्स लीगसाठीची पात्रता मिळविली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या डेक्कन चार्जर्सची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. संघ केवळ मात्र 82 धावांवर 18.3 व्या षटकातच सर्वगडी गमावले. चॅलेंजर्सकडून कर्णधार अनिल कुंबलेने चार, प्रवीण कुमार आणि जॅक कॅलिसने दोन गडी गमावले. सामन्याच्या सुरूवातीला आलेले सलामी फलंदाज चांगली सुरूवात देण्यात अपयशी ठरले.
