Showing posts with label IPL. Show all posts
Showing posts with label IPL. Show all posts

शरद पवार नावाचं गारूड

बाळासाहेब ठाकरेंसारखं समोरच्यांना आपल्या कवेत घेईल अमोघ वक्तृत्व नाही, लाखा-लाखांच्या सभा त्यांच्या भरत नाहीत,  शिवसैनिकांसारखे जीव ओवाळून टाकतो, असे म्हणणारे कार्यकर्ते नाहीत, ते कधीही कोणताही आदेश देत नाही पण तरीही शरद पवार या नावाचं गारूड या महाराष्ट्रभर का असावं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित असतं. लाखाच्या सभा भरल्या नसल्या ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा
करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे.

मोदींविरुद्ध पुरेसे पुरावे नाही

नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदींविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाबाबत पुरेसे पुरावे नाही. केवळ चार आरोपांबाबत ललित मोदी यांना कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आयपीएल संघांची विक्रीत मोदींनी आर्थिक हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

चिरायु अमीन आयपीएलचे हंगामी अध्‍यक्ष

मुंबई

आयपीएलमध्‍ये भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपांचा सामना करीत असलेल्‍या ललित मोदी यांना आयपीएल अध्‍यक्ष आणि कमीशनरपदावरून बडतर्फ केल्‍यानंतर या पदावर हंगामी अध्‍यक्ष म्हणून वडोदरा क्रिकेट असोसिएशनचे अध्‍यक्ष चिरायु अमीन यांची निवड करण्‍यात आली आहे. अमीन बीसीसीआयचे उपाध्‍यक्षही आहेत.

धोनीचा चेन्‍नई सुपर बनला आयपीएलचा 'किंग'


मुंबई

नवी मुंबईच्‍या डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्‍या गेलेल्‍या आयपीएल-3 च्‍या अंतिम सामन्‍यात महेंद्र सिंह धोनीच्‍या चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच क्षेत्रात सांघिक एकतेचे प्रदर्शन घडवत मुंबई इंडियन्‍सचा 22 धावांनी पराभव करून आयपीएल-3 चे विजेतेपद पटकावले आहे.



बैठकीपूर्वीच मोदी बरखास्‍त होणार!


नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयपीएल कमीशनर ललित मोदी यांना बरखास्‍त करण्‍याची तयारी पूर्ण केली असून मोंदीकडून बीसीसीआयला केल्‍या जात असलेल्‍या आव्‍हानाच्‍या पाश्‍वभूमीवर सोमवारी होणा-या गव्‍हर्निंग कौन्सिलच्‍या बैठकीपूर्वीच मोदींना बरखास्त केले जाण्‍याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार बीसीसीआय अध्‍यक्ष शशांक मनोहर अंतिम सामना संपताच मोदींना पदावरून दूर करणार आहेत.

मोदींच्‍या दबावानंतर पवारांचा बचावात्‍मक पवित्रा


मुंबई

आयपीएलमधील भ्रष्‍टाचाराची पाळेमुळे खोलवर रूतली असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले असून आपल्‍यावर राजीनाम्याचा दबाव आणण्‍याचा किंवा पदावरून दूर करण्‍याचा प्रयत्न झाल्‍यास आपण सर्वांचे पितळ उघडे करू अशी धमकी देणा-या ललित मोदींबाबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष आणि आयसीसीच उपाध्यक्ष शरद पवार यांनी अधिक नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र ती घेतानाही आपला आयपीएलशी काहीही संबंध नसल्‍याचा दावा त्‍यांनी पुन्‍हा एकदा केला आहे.

चॅलेंजर्स समोर डेक्कन फ्यूज

मुंबई

डेक्कन चार्जर्सच्‍या 82 धावांच्‍या सोप्‍या आव्‍हानाचा सामना करण्‍यासाठी उतरलेल्‍या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने 13.5 षटकातच सामना नऊ गड्यांनी जिंकला असून या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्सने या वर्षाच्‍या सप्‍टेंबरमध्‍ये होणा-या ट्वेंटी20 चॅम्पियन्‍स लीगसाठीची पात्रता मिळविली आहे.

आयपीएलमध्‍ये 'सहारा पुणे वॉरिअर्स'ची एन्‍ट्री

पुणे


इंडियन प्रीमियर लीगमध्‍ये नव्‍याने सहभागी झालेल्‍या पुणे फ्रॅंचाईजी संघाचे नाव सहारा पुणे वॉरिअर्स असे ठेवण्‍यात आले असून येथील स.प. महाविद्यालयाच्‍या प्रांगणात झालेल्‍या भव्‍य कार्यक्रमात संघाच्‍या नावाची घोषणा करण्‍यात आली. सहारा इंडिया परिवाराचे अर्ध्‍वयु सुब्रोतो रॉय ही घोषणा केली.

'शरदा'च्‍या चांदण्‍यातही मोदी 'होरपळले'!

नवी दिल्ली

आयपीएल फ्रेंचायजी प्रकरणातील घोटाळ्याच्‍या केंद्रस्‍थानी असलेल्‍या ललित मोदी यांना राजीनामा देण्‍याचे 'आदेश' बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असल्‍याची माहिती अंतर्गत सुत्रांनी दिली आहे. पवार गेल्‍या काही दिवसांपासून मोदींच्‍या बचावासाठी प्रयत्न करीत होते, मात्र आता प्रकरण हाताबाहेर गेल्‍याने आणि बीसीसीआयनेही याबाबत कठोर भूमिका घेतल्‍याने मोदींची गच्‍छंती अटळ झाली आहे.  

ललित मोदी 'नरमले'


मुंबई

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) पंगा घेण्याच्या तयारीत असलेल्या ललित मोदी यांनी यु-टर्न घेतला आहे. मोदींनी आपले पाऊल मागे घेत मला सर्व प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी पाच दिवसांचा तरी अवधी द्या, अशी विनंती बीसीसीआयला केली आहे. न्यायालयात जाण्याचा विचारही मोदींनी सोडून दिला आहे.

आयपीएल चौकशीसाठी संसदीय समितीची मागणी

संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहात गदारोळ

नवी दिल्ली

इंडियन प्रिमियर लीगमध्‍ये मोठ्या प्रमाणावर घोटाळ्याचे पुरावे हाती येत असून या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी सरकारने संयुक्त संसदीय समितीची स्‍थापना करावी अशी मागणी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी केली असून सरकारच्‍या चौकशीवर आपल्‍याला विश्‍वास नसल्‍याचे म्हटले आहे. विरोधकांच्‍या या मागणीमुळे संसदेत जोरदार गदारोळ सुरू असून त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकुब करावे लागले आहे.

अंतिम सामनाः सचिन विरुद्ध धोनी

मुंबई

डग बोलींगरच्‍या घातक गोलंदाजीच्‍या बळावर चेन्‍नई सुपर किंग्जने गतविजेत्या डेक्कन चार्जर्सचा 38 धावांनी पराभव केला असून अंतिम सामन्‍यात धडक मारली आहे. आयपीएल-3 च्‍या अखेरच्‍या सामन्‍यात मास्‍टर ब्लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या मुंबई इंडियन्‍स विरुद्ध विनिंग कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या चेन्‍नई सुपर किंग्जमध्‍ये सामना रंगणार असून यंदा प्रथमच भारतीय कर्णधाराचा संघ आयपीएल विजेता ठरणार आहे.

शाहरूखच्या संघात गैरव्यवहाराचे पुरावे

कोलकता

प्राप्‍तीकर विभागातर्फे बंगाल क्रिकेट असोसिएशन व कोलकता नाईट रायडर्सच्या कार्यालयांवर बुधवारी टाकलेल्‍या छाप्‍यात अभिनेता शाहरूख खानच्या कोलकता नाईट रायडर्सच्या आर्थिक व्यवहारात अनियमिततेचे पुरावे आढळून आले आहेत.

आयपीएल प्रसारणात 275 कोटींचा घोटाळा

मुंबई

आयपीएलची प्रसारणाशी संबंधित कंपनी एमएसएम आणि डब्यूएसजी यांच्या कंपन्‍यांच्‍या कार्यालयात प्राप्तिकर विभागाने टाकलेल्‍या छाप्‍यातून प्रसारणात 275 कोटींचा घोटाळा उघड झाल्याचे उघड झाले आहे.

मुंबईची अंतिम सामन्‍यात 'रॉयल' धडक

मुंबई

आयपीएल-3 च्‍या फायनल सामन्‍यासाठी होत असलेल्‍या पहिल्‍या उपांत्य सामन्‍यात मुंबई इंडियन्‍सने रॉयल चॅलेंजर्सचा 35 धावांनी पराभव करून अंतिम सामन्‍यात धडक मारली आहे. पोलार्डच्‍या भेदक गोलंदाजी आणि जबाबदार फलंदाजीने संघाचा विजय सोपा केला. पोलार्ड सामनावीर ठरला.

आयपीएलः कोलकाता, चेन्नई, हैदराबाद कार्यालयांवरही छापे

नवी दिल्ली

आयपीएलच्‍या फ्रेंचायजीवर प्राप्‍तीकर विभागाचे छापे सुरूच असून आता त्‍याभोवतीचा फास आवळला जात आहे. अधिका-यांच्‍या पथकाने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल सोबतच हैदराबाद येथील डेक्कन चार्जर्सच्‍या कार्यालयावर व चेन्नई सुपर किंग्सचे मालक इंडिया सीमेंटवरही छापा टाकला आहे.

वर्ल्डकप विजेत्या संघाला एक कोटी डॉलर

दुबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय उपखंडात सन 2011 मध्ये होणार्‍या विश्वकरंडक (वर्ल्डकप) स्पर्धेच्या पुरस्काराच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ केली आहे. ही स्पर्धा जिंकणार्‍या संघाला आता एक कोटी डॉलर पुरस्कार म्हणून मिळणार आहे.

ललित मोदींचे बीसीसीआयविरोधात बंड

मुंबई

आयपीएल आयुक्त ललित मोदी यांची गच्छंती अटळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विरोधात बंड पुकारले आहे. मंडळाच्या 26 एप्रिल रोजी होणार्‍या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीस येण्यास मोदी यांनी नकार दिला असून बीसीसीआयला ही बैठक बोलविण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले आहे.

मुंबईचा दहावा विजय

बंगरूळु

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने आपली विजयी मालिका कायम राखली असून रॉयल चॅलेजर्स 57 धावांनी पराभव केला आहे. मुंबई संघाचा हा दहावा विजय आहे. त्‍यामुळे मुंबई संघ 20 गुणांसह गुणतक्यात आघाडीवर आहे.

बंगरूळु स्‍टेडियमबाहेर दोन स्‍फोट, 15 जखमी


तिसरा बॉम्‍ब निकामी
बंगळुरू

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ दोन कमी क्षमतेच्या बॉम्‍बचा स्फोट झाला. यात 5 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 15 जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी तिसरा बॉम्‍ब त्‍वरित शोधून तो निकामी केले आहे. या स्फोटामुळे मुंबई आणि बंगळुरू दरम्यान होणारा सामना एक तास उशिराने सुरु झाला.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner