शाहरूखच्या संघात गैरव्यवहाराचे पुरावे

Posted on Thursday, April 22, 2010 by maaybhumi desk

कोलकता

प्राप्‍तीकर विभागातर्फे बंगाल क्रिकेट असोसिएशन व कोलकता नाईट रायडर्सच्या कार्यालयांवर बुधवारी टाकलेल्‍या छाप्‍यात अभिनेता शाहरूख खानच्या कोलकता नाईट रायडर्सच्या आर्थिक व्यवहारात अनियमिततेचे पुरावे आढळून आले आहेत.

भारतीय महसूल सेवेतील उपसंचालक अखिलेंदू जाधव यांनी या संदर्भात दिलेल्‍या मा‍हितीनुसार संघाच्‍या व्‍यवहारात काही गोंधळ आढळून आला असून त्‍यात अधिक तपास केला जात आहे.

मॉरीशससारख्या करात सवलती असलेल्या काही देशांतून संघासाठी पैसे आल्‍याचे या तपासणीत आढळून आले असून त्या संदर्भातील कायदेशीरता बाबी तपासून पाहिल्‍या जात असल्‍याचे अधिका-यांनी सांगितले.

बुधवारी इडन गार्डन येथील बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या दोन कार्यालयांत आणि कोलकता नाईट रायडर्सच्या तसेच तिची पालक कंपनी असलेल्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या आयटीसी शोनार बांगला येथील कार्यालयात कर अधिकार्‍यांनी तपासणी केली होती.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner