बीसीसीआय विरोधात मोदी न्यायालयात
Posted on Thursday, April 22, 2010 by maaybhumi desk
आयपीएलचे आयुक्तपद वाचविण्यासाठी ललित मोदींनी कंबर कसली असून त्यासाठी त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्गही अवलंबण्याची तयारी चालविली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. येत्या 26 एप्रिलला होणार्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकी विरोधात मोदी न्यायालयात जाणार आहेत.
बीसीसीआयने आयपीएलच्या आयुक्तपदावरुन मोदींचा पायउतार करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली असतानाच मोदीही जोरदार टक्कर घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी राम जेठमलानी आणि हरीश साळवे या नामांकीत वकीलांचे मार्गदर्शन घेतले आहे. न्यायालयात 26 एप्रिल रोजी होणारी बैठक अनधिकृत ठरविण्याची मागणी ललित मोदी करणार आहेत.
