Sirte- Former Libyan leader Muammar Gaddafi died of wounds suffered on Thursday as fighters battling to complete an eight-month-old uprising against his rule overran his hometown Sirte, Libya's interim rulers said.
His killing, which came swiftly after his capture near Sirte, is the most dramatic single development in the Arab Spring revolts that have unseated rulers in Egypt and Tunisia and threatened the grip on power of the leaders of Syria and Yemen.
"He (Gaddafi) was also hit in his head," National Transitional Council official Abdel Majid Mlegta told Reuters. "There was a lot of firing against his group and he died."
Showing posts with label international news. Show all posts

इजिप्त क्रांतीचा विजय

- होस्नी मुबारक पायउतार
- सत्ता लष्कराकडे
- देशभर जल्लोष, विरोधी पक्ष समाधानी
- लवकरच निवडणुका : लष्कराची घोषणा
कैरो, दि. ११ : तब्बल तीन दशके इजिप्तला आपल्या पोलादी पकडीत ठेवणारे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक आज अखेर जनक्षोभापुढे नमले. सप्टेंबरपर्यंत सत्ता सोडणार नसल्याची प्रतिज्ञा करून २४ तास उलटत नाहीत, तोच त्यांना कैरो सोडून परागंदा व्हावे लागले. मुबारक यांनी राजीनामा देताना आपली सत्ता लष्कराकडे हस्तांतरीत केली आहे. उपराष्ट्राध्यक्ष उमर सुलेमान यांनी राष्ट्रीय वाहिनीवरून ही घोषणा करताच इजिप्तवासियांनी देशभर जल्लोष केला. इजिप्त क्रांतीला पहिले यश मिळाले असले तरी देशात लोकशाही प्रस्थापित होणार की पुन्हा एकदा लष्करी हुकूमशाहीच्या गर्तेत देश लोटला जाणार हे नजिकच्या काळात स्पष्ट होऊ शकेल.
Posted on Saturday, February 12, 2011
पाकमध्ये टि्वटरवरही बंदी
इस्लामाबाद
सोशल नेटवर्किग साइट फेसबुक आणि व्हीडिओ साइट युट्युबवर बंदीनंतर पाकिस्तानने आता टि्वटरवरही बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात शुक्रवारी सकाळपासूनच लोकांना टि्वटरची साइट उघडण्यात अडचणी येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात टि्वटर उघडण्याचा प्रयत्न केला गेला तर या साईटवर निर्बंध घातले गेल्याचा संदेश येत असतो.

Posted on Friday, May 21, 2010
पोलंड राष्ट्राध्यक्षांचा विमान अपघात नव्हे घात!
मॉस्को
पोलंडचे राष्ट्राध्यक्ष लेख कॅंझिस्की आणि देशातील अनेक दिग्गज मंत्री व सैन्य अधिका-यांच्या विमान अपघातामागे घातपाताची शक्यता तपासातून समोर आली असून अपघाताच्या वेळी विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकांसह आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती उघड झाली आहे. वैमानिकाला वारंवार मनाई करूनही त्याने विमान उतरवल्यानंतर हा अपघात घडला होता.

वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ 13 मजली मशिद!
न्यूयॉर्क
येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याच्या स्मृती जपून असलेल्या ग्राउंड जीरो जवळ उभारल्या जात असलेल्या मशिदीस अमेरीकन नागरिकांनी विरोध करण्यास सुरूवात केली असून अशा प्रकारची कुठलीही मशिद उभारणे हे या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

Posted on Tuesday, May 18, 2010
फुटीर थाई जनरलचा मृत्यू, बँकॉक पुन्हा पेटणार
बँकॉक
थायलँडमध्ये सरकार विरोधी निदर्शनात मदत करणा-या एक फुटीर जनरलचा एका अज्ञात बंदुकधा-याने केलेल्या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाल्यानंतर सोमवारी मत्यू झाला असून या घटनेनंतर राजधानी बँकॉकमध्ये आणखीन हिंसाचार वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बँकॉकच्या रस्त्यांवर गेल्या पाच दिवसांपासून हिंसाचार सुरू असून आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या मेजर जनरल खाटिया स्वसदिफूल यांचा आज येथील वजीरा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सैन्याच्या या फुटीर जनरलवर 'रेड शर्ट' आंदोलकांच्या मदतीसाठी नीमलष्करी दल तयार केल्याचा आरोप आहे.

Posted on Monday, May 17, 2010
ज्वालामुखीच्या राखेमुळे पुन्हा विमानसेवा बंद
लंडन
आईसलँड येथील ज्वालामुखीतून पुन्हा राख निघण्यास सुरूवात झाली असून यामुळे पुन्हा जगभरातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. जगातील सर्वांत व्यस्त असलेल्या हिथ्रो हे विमानतळ यामुळे पुन्हा बंद करावे लागले आहे.
या ज्वालामुखीतून गेल्या महिन्याभरापासून सातत्याने राखेचा धूर निघत आहे. ब्रिटनच्या नॅशनल एअर ट्रॅफिक सर्व्हीसेसने दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजेपासून विमानसेवा बंद करण्यात आली असून राखेचे वादळ वेगाने दक्षिणेच्या दिशेने पसरत आहे.

पाक-अफगाणमध्ये अमेरीकेचे अनेक हेर सक्रीय
वॉशिंग्टन
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अजुनही अमेरीकन हेरगिरी नेटवर्क सक्रीय असून अमेरीकेच्या या गुप्तहेरांनी अनेक गुप्त माहिती शोधून काढली आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच सरकारने काही सैन्य अधिकारी आणि माजी सीआयए अधिका-यांना या भागात पाठवल्याचा दावा केला होता. मात्र नंतर लगेच ते बंद केल्याचे सांगितले होते.

मोस्ट वॉन्टेडच्या यादीत दाऊदचा नंबर तिसरा
वॉशिंग्टन
भारताचा अंडरवर्ल्ड दहशतवादी डॉन दाऊद इब्राहिमचा जगभर शोध घेतला जात असून अमेरीकन बिजनेस मॅगझीन फोर्ब्सने जारी केलेल्या मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या यादीत तो तिस-या क्रमांकावर आहे. 1993 च्या मुंबई स्फोटाचा मास्टरमाइंड असलेला दाऊद पाकिस्तानात लपून बसल्याचे पुरावे अनेकदा भारताने दिले आहेत. मात्र पाकने तो आपल्याकडे नसल्याचा दावा केला आहे.

आनंदला मिळाले सात कोटी रुपये
नवी दिल्ली
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता ठरलेला विश्वनाथन आनंद याला विजेतेपदाचा पुरस्कार असलेले सात कोटी रुपये मिळाले आहेत. आनंदने चौथ्यांदा विजेतेपद मिळविले आहे.
आनंदने बुल्गारियाच्या वेसेलिन टोपालोव याचा पराभव करीत 12 लाख यूरो (जवळपास सात कोटी रुपये) मिळविले. टोपालोवला आठ लाख यूरो रक्कमेवर समाधान व्यक्त करावे लागले. या विजेतेपदामुळे आनंदला ईएलओ रेटिंग गुण मिळाले. यामुळे त्याचे रेटींग 2800 च्याही पुढे जाईल.

Posted on Thursday, May 13, 2010
लिबीयात विमान अपघात, 105 ठार
त्रिपोली
लिबीयाच्या त्रिपोली विमानतळावर विमान उतरताना मोठा अपघात झाला असून त्यात 105 जण ठार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे विमान दक्षिण आफ्रीकेतून लिबीयाच्या त्रिपोली येथे जात होते. अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नसून घटनेनंतर बचाव पथक व अग्निशमन दलाच्या गाड्या अपघात स्थळी पोचल्या आहेत.

Posted on Wednesday, May 12, 2010
केमरून ब्रिटनचे नवे पंतप्रधान!
लंडन
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कंजरवेटिव पक्षाचे नेते डेव्हीड केमरून यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून कंजरवेटीव्ह पक्षाने लिबरल डेमोक्रेटिक पक्षासोबत आघाडी बनविण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, या घटनाक्रमानंतर विद्यमान पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Posted on Tuesday, May 11, 2010
कसाबला मदद लागल्यास करू: पाक
इस्लामाबाद
आतापर्यंत कसाब पाकिस्तानी नसल्याचे आणि पाक सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा करणा-या पाकला अचानक कसाब प्रेमाचा उमाळा आला असून मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाबला भारतीय न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर जर त्याने मदत मागितली तर त्यावर आपण विचार करू, असे प्रतिपादन पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी केले आहे.

Posted on Thursday, May 06, 2010
टायगर वुड्सचे स्थान धोक्यात
फ्लोरिडा
जागतिक गोल्फ क्रमवारीत गेल्या पाच वर्षांपासून असलेल्या टाइगर वुड्सच्या एकाधिकारशाहीवर आता अनिश्चिततेचे वादळ घोंगावत असून अमेरीकन गोल्फपटू फिल मिकेलसन आगामी 6 ते 9 मे दरम्यान येथे होणार असलेल्या प्लेयर्स चँपियनशीपमध्ये वुड्सला मागे टाकून क्रमांक एकचे स्थान मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Posted on Wednesday, May 05, 2010
टाईम्स स्क्वेअर स्फोटात सहभागाची फैसलची कबुली
न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअरमध्ये ठेवण्यात आलेल्या कार बॉम्बचा स्फोट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाकिस्तानी वंशाच्या अमेरीकन नागरीक फैसल शहजादवर निश्चित करण्यात आला असून त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर पाकिस्तानातील त्याच्याशी संबंधितांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे.
न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअरमध्ये ठेवण्यात आलेल्या कार बॉम्बचा स्फोट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाकिस्तानी वंशाच्या अमेरीकन नागरीक फैसल शहजादवर निश्चित करण्यात आला असून त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर पाकिस्तानातील त्याच्याशी संबंधितांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे.
Posted on Wednesday, May 05, 2010
हकीमुल्लाची अमेरीकेला आणखी एक धमकी
इस्लामाबाद
पाकिस्तानी तालिबानचा नेता हकीमुल्ला मसूद याने एका नवीन व्हीडिओच्या माध्यमातून अमेरीकेवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. हकीमुल्ला जानेवारीत एका कारवाईत मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता.
या व्हीडिओवर चार एप्रिलची तारीख आहे. महसूदने आपल्या धमकीत म्हटले आहे, की आमचे फिदायीनी
(आत्मघाती) हल्लेखोर अमेरीकेतील मोठ्या शहरांमध्ये दाखल झाले असून लवकरच मोठे हल्ले करण्यात येणार आहेत.

Posted on Monday, May 03, 2010
25000 फुटावरून कोसळले विमान!
पायलटच्या समय सुचकतेने मोठा अपघात टळला
| Add caption |
दुबईवरून कोचीकडे जात असलेल्या एमिरेट्सच्या बोइंग 777 विमान गोव्याजवळ मोठ्या अपघातातून पायलटच्या कुशलतेमुळे बचावले असून ते सुखरूप रित्या कोची विमानतळावर उतरवण्यात आले आहे. या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले आहेत.
दुबईवरून कोचीकडे जात असलेल्या बोइंग 777 विमान आकाशात 25000 फूट उंचीवर असताना अवकाशात अचानक मोठे वादळ उठून ते त्यात सापडले.
Posted on Sunday, April 25, 2010
मलेरियामुळे दरवर्षी साडेआठ लाख लोकांचा मृत्यू
न्यूयॉर्क
जगभरात दरवर्षी मलेरियामुळे सुमारे 850,000 लोकांना जीव गमवावा लागत असल्याची आकडेवारी यूनिसेफने दिली असून यापैकी सुमारे 90 टक्के मृत्यू आफ्रीकन उपखंडातील गरीब देशांमध्ये होत असते.
युनायटेड नेशन्स इंटरनेशनल चिल्ड्रेंस इमरजन्सी फंडचे (यूनिसेफ) कार्यकारी निर्देशक एन व्हॅनेमन यांनी या संदर्भात दिलेल्या आकडेवारीनुसार सर्व देशांमध्ये मलेरियावर नियंत्रणा संदर्भात संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांच्याकडून निश्चित केल्या गेलेल्या आकडेवारीला पूर्ण करण्यासाठी 250 दिवस शिल्लक आहेत.

Posted on Saturday, April 24, 2010
Subscribe to:
Posts (Atom)