'लादेनला पाकी अधिका-यांकडूनच आश्रय'
Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk
पाकिस्तानी प्रशासनातील काही उच्च पदस्थ संरक्षण अधिका-यांचे अल कायदा आणि तालिबानशी घनिष्ट संबंध असून त्यांनीच लादेनला लपवून ठेवले असल्याचा दावा अमेरीकन परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांनी केला आहे.
क्लिंटन यांनी 'सीबीएस'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, की काही पाकिस्तानी अधिका-यांनी अल कायदा आणि तालिबानशी चांगले संबंध तयार केले आहेत. या अधिका-यांकडे दोन्ही संघटनांची अमेरीकेपेक्षा अधिक माहिती असून ते पाकमधील विद्यमान सरकारच्या काही जणांकडे ओसामा बिन लादेन, अल कायदा किंवा मुल्ला उमर आणि अफगाणी तालिबानी नेत्यांबद्दल संपूर्ण माहिती आहे.
