Showing posts with label marathi films. Show all posts
Showing posts with label marathi films. Show all posts

मी नथूराम गोडसे बोलतोय (संपूर्ण नाटक)

मी नथूराम गोडसे बोलतोय- 1



मी नथूराम गोडसे बोलतोय- 2

 मी नथूराम गोडसे बोलतोय-3

 मी नथूराम गोडसे बोलतोय-4


 मी नथूराम गोडसे बोलतोय-5



मी नथूराम गोडसे बोलतोय-6


 मी नथूराम गोडसे बोलतोय-7


 मी नथूराम गोडसे बोलतोय-8


 मी नथूराम गोडसे बोलतोय-9



मी नथूराम गोडसे बोलतोय-10




मी नथूराम गोडसे बोलतोय-11





मी नथूराम गोडसे बोलतोय-12

तो मी नव्हेच

तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखीत एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे.कथानक : नाटकाचे कथानक बहूतेक अंशी कोर्टात घडते. आरोपीवर (जो स्वत:ला नीपाणीचा तंबाखुचा व्यापारी "लखोबा लोखंडे" म्हणवून घेतो) काही लोकांना पैसे घेऊन लुबाडल्याचा तसेच काही स्त्रीयांशी खोटे लग्न करुन त्यांचे दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप आहे. सरकारी वकील किरकिरे सर्व फिर्यादींना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावतात आणि त्यांची तपासणी करतात.

जोगवा (व्‍हीडिओ सॉंग)

मोरया- मोरया  (उलाढाल)


ये... गो... ये... ये मैना (जत्रा)


जीव दंगला... (जोगवा)


लल्‍लाटी भंडार (जोगवा)
 

मन रानात गेलं गं... (जोगवा)

नटरंग - व्‍हीडिओ

अप्‍सरा आली... (नटरंग)



वाजले की बारा... (नटरंग)



 खेळ मांडला... (नटरंग)


 
मथुरेच्‍या बाजारी... (नटरंग)



नटरंग उभा... (नटरंग)

मराठी संगीताचे बाबूजीः सुधीर फडके

-विकास शिरपूरकर


मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर विनायक फडके हे नाव अजरामर आहे. गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणा-या गीतांतून मराठी मनामनावर बाबुजींनी राज्य केले आहे. मराठी-हिंदी गीतांचे गायक व संगीतकार म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. सलग पाच दशकांहून अधिककाळ त्यांच्या गीत आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले आहे.


बाबूजींचा जन्म 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर शहरातील एका वकिली व्यवसाय करणा-या कुटुंबात झाला. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले.

'सारेगमप'मध्ये सोमवारी महाराष्ट्र दिन विशेष

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची पन्नास वर्षे सर्वत्र दणक्यात साजरी होत असताना झी मराठीवरील लोकप्रिय 'आयडिया सारेगमप' हा कार्यक्रमही राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या पारंपरिक गीतांचा खास नजराणा पेश करणार आहे. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्तचा हा विशेष भाग सोमवार, दि.3 मे रोजी झी मराठीवर प्रक्षेपित होईल.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उत्‍साहात

मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित सत्तेचाळीसाव्या मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्याचे शानदार उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे झाले.

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, आमदार श्रीमती ऍनी शेखर, आमदार माणिकराव ठाकरे, तसेच चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लालबाग-परळः झाली मुंबई सोन्याची


 - विकास शिरपूरकर

1990च्‍या दशकात मराठी नाट्यरसिकांना वेड लावणा-या जयंत पवार यांच्‍या अधांतरवर 'लालबाग-परळ झाली मुंबई सोन्‍याची' हा चित्रपट बेतला आहे. त्‍यामुळे त्‍याकडूनही तशी अपेक्षा होणे साहजिकच होतं. महेश मांजरेकरने हे आव्‍हान यशस्‍वीपणे पेलले आहे हे सांगण्‍याची गरज नसावी.

महेश मांजरेकर या अष्‍टपैलू कलावंतामध्‍ये निर्माता-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक अशा अनेक भूमिका सहजपणे वठवण्‍याची असलेली हातोटी नक्कीच कौतुकास्‍पद आहे. हिंदीतून 'वास्‍तव' सारखे माईलस्‍टोन सिनेमे देणा-या महेशने सध्या मराठीकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि तो एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट घेऊन येऊ लागला आहे हे सूचिन्‍ह म्हणायला हवे. 

मराठी चित्रपट निर्मिती अभिमानास्‍पद बाबः अमिताभ

पुणे

मी गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असून मराठी भाषेबद्दल आणि महाराष्‍ट्राबद्दल सामान्‍य मराठी माणसा इतकाच मलाही अभिमान आहे. त्यामुळे मी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि यापुढेही करत राहीन, असे प्रतिपादन महानायक अमिताभ बच्‍चन यांनी पुणे येथे केले.

अमिताभ बच्‍चन कार्पोरेशन लिमिटेडची निर्मिती असलेल्‍या विहीर या मराठी चित्रपटाच्‍या प्रिमियरसाठी पुणे येथे आलेल्‍या अमिताभ यांनी यावेळी आपल्‍या कर्मभूमीबद्दल कृतज्ञता व्‍यक्त केली.

'विहीर'चा भव्य प्रीमियर


अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेडद्वारा निर्मित पहिला मराठी चित्रपट विहीर महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. गुरुवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी या पहिल्या मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर जुहू येथील पीव्हीआर चित्रपटगृहात आयोजित केला होता. चित्रपटाचे प्रदर्शन पीव्हीआर मल्टीप्लेक्सतर्फे करण्यात आले आहे.

एक जखम सुगंधी....

 गजलनवाज भीमराव पांचाळे (Bhimrao Panchale Gazals) यांच्‍या 'एक जखम सुगंधी' या गजल अल्‍बममधील ही सुमधुर गीते....

दिलीप प्रभावळकरांना गद्रे पुरस्कार

मुंबई
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी तसेच छोटया पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेता व लेखक दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा सु.ल. गद्रे कलाकार पुरस्कार' जाहीर झाला आहे. रविवारी १४ मार्च रोजी प्रभावळकर यांना नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते मुलुंड येथील संस्थेच्या गद्रे सभागृहात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

राहुल आणि त्‍याचे स्वयंवर!

- विकास शिरपूरकर
rahul-mahajan

मराठीत एक जुनी उक्ती आहे 'पुत्र व्‍हावा ऐसा गुंडा, ज्‍याचा तिन्‍ही लोकी झेंडा' इथं गुंडा हे कर्तृत्ववान या अर्थाने आहे. प्रत्येक बापाला आपला मुलगा आपल्‍या पेक्षा अधिक कर्तृत्‍ववान व्‍हावा असे वाटते.

दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांनाही कदाचित तसेच वाटले असावे. पण वाटते ते सगळे होतेच असे नाही. प्रमोदजींचा एकुलता एक दिवटा

मुंबई कष्‍टक-यांचीहीः आशा भोसले

मुंबई

'मुंबई सर्वांचीच' या विधानात आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही सूर मिसळला आहे, तोही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच.

एका टिव्ही चॅनेलच्या वतीने आशाताईंचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे हेही उपस्थित होते. ही संधी साधून आशाताईंनी मुंबई आणि मराठी माणूस या वादासंदर्भात आपले मत व्यक्त केले.

रिंगा रिंगा- एक थरारक चित्रपट

मराठी चित्रपटांनी खरोखरच कात टाकलेली जाणवत आहे. हिंदीमध्ये त्याच-त्याच फॉर्म्युल्यावर चित्रपट बनत असताना मराठीत मात्र वेगळी वाट चोखाळली जात आहे. झेंडा, जोगवा, नटरंगपाठोपाठ आता वेगळ्या पठडीतला रिंगा रिंगा शुक्रवार प्रदर्शित होत आहे. मराठीत अनपेक्षित शेवटाकडे जाणारे चित्रपट फारच कमी बनतात, मात्र त्याची उणीव रिंगा रिंगा भरून काढताना दिसतोय.

‘‘याला जीवन ऐसे नाव ’’

renuka-shahane-in झी मराठीवर उलगडले जाणार आगळ्यावेगळ्या जीवनाचे आगळेवेगळे अंतरंग !
प्रत्येकाचं जीवन आणि जगण्याची त-हा वेगवेगळी असते आणि बरेचदा एखाद्या अगदी सामान्य भासणा-याच्या जीवनातही काहीतरी इतकं वेगळं, इतकं असामान्य घडतं, की त्याचं जीवन एखाद्या चित्तरकथेसारखं वाटतं. एखादा भीषण धक्का, पण त्यातून सावरणं... एखादा क्रूर आघात, पण त्यातून पुढे चालत राहणं... कधी दैवानेच इतरांपेक्षा वेगळं म्हणून जन्माला घालण्यामुळे वाट्याला येणारी अवहेलना सोसत त्यातून जगत राहणं...

राजकीय चित्रपट? नको रे बाबा!- अवधूत गुप्ते

नागपूर

एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झेंडा चित्रपटाच्या प्रदर्शनाला संपूर्ण संरक्षणाच्या गोष्टी करतात आणि त्याचवेळी त्यांच्याच पक्षाच्या आणि त्यांच्याच मंत्रीमंडळात असलेल्या नारायण राणेंशी संबंधित स्वाभिमानी संघटनेचे नेते चित्रपट बंद पाडायच्या गोष्टी करतात. यावेळी आम्हाला संरक्षण देण्याऐवजी, राणेंशी बोलून स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री आवरू शकत नाहीत काय असा सवाल झेंडा या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी येथे बोलताना केला.

दादासाहेबांची चित्रसृष्‍टी

dadasaheb phalake चित्रपटसृष्टीची पंढरी, मुंबई महानगराचं फुप्फुस आणि रूपेरी-चंदेरी दुनियेचं माहेर म्हणून मुंबईच्या चित्रनगरी अर्थात फिल्मसिटीची ओळख... भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने गोरेगावच्या जंगलात गेल्या ३१ वर्षांपासून चित्रसृष्टीमध्ये अमूल्य योगदान देणारी चित्रनगरी महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं सांस्कृतिक भूषण आहे.

जावई माझा नवसाचा

jawai maza navsacha
विज्ञान जिथे हात टेकतं तिथं श्रध्देचा प्रवास सुरू होतो. हाच धागा पकडून निर्माते प्रकाश सुर्वे यांनी निर्माण केलेला ' जावई माझा नवसाचा' हा चित्रपट १२ फेबु्रवारीपासून मुंबईत सर्वत्र प्रद्रर्शित होत आहे. भैरव फिल्मस्‌ प्रस्तुत या चित्रपटात दक्षिण कोकणची काशी समजली जाणारी व प्रति तुळजापूर म्हणून मान्यता पावलेली सुप्रसिध्द आंगणेवाडीची भराडी देवी हिचे महात्म्य या चित्रपटात कथेच्या अनुषंगाने मांडण्यात आली आहे.

हरिश्चंद्राची फॅक्टरीः कलाकृतीचा उत्कृष्‍ट चित्रपट

बॅनर- यूटीवी मोशन पिक्चर्स, पापरिका मीडिया आणि मयसभा प्रॉडक्शन
निर्माता- रॉनी स्क्रूवाला, स्मिती कनोडाई, परेश मोकाशी
दिग्दर्शक- 449px-harishchandrachi_factory2c_2009_film_posterपरेश मोकाशी
संगीत- आनंद मोडक
प्रॉडक्शन डिजाइनर- नीतिन चंद्रकांत देसाई
कलाकार- नंदू माधव, विभावरी, मोहित गोखले, अथर्व कर्वे


भारतामध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणार्‍या दादासाहेब फाळके यांचे जीवनचरित्र आजच्या तरुण पिढीसमोर आणण्याचे धाडस करणार्‍या रंगकर्मी परेश मोकाशीचे अभिनंदन करावे तेवढे थोड़ेच आहे. आज जगामध्ये सगळ्यात जास्त चित्रपटनिर्मिती करणार्‍या देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. परंतु, ज्या व्यक्तीने भारतात चित्रपटसृष्टीचे बीज रोवले त्याच्या चित्रपटांची रिळे अर्काइव्हकडे नाहीत किंवा फाळकेंसंदर्भात एखादे संग्रहालयही उभारले गेले नाही.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner