Showing posts with label यांनी घडविली मायभूमी. Show all posts
Showing posts with label यांनी घडविली मायभूमी. Show all posts

लोकमान्‍यांची लोकमान्‍यता

- विकास शिरपूरकर

ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केलं. इतकी वर्षे त्यांना आपल्याला गुलाम बनवून ठेवणे शक्य झालं कारण जातीपातीच्या धर्माधर्माच्या भिंतींमध्ये विभागला गेलेला भारतीय समाज. देशाला स्वातंत्र्य हवे असेल तर आधी या विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणण्याची जातीजातीमधील तेढ कमी करण्याची आवश्यकता असल्याचे लोकमान्य टिळकांनी ओळखले.

स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.

संत ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठेपण सर्व संतमंडळींनी मान्य केलेले, शिरोधार्य मानलेले दिसते. ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आणि आध्यात्मिक गुरु संत निवृत्तीनाथांनी अरे अरे ज्ञाना, झालासि पावन तुझें तुज ध्यान कळों आलें अशी शाबासकीची पावती ज्ञानोबांना दिली. तर धाकट्या मुक्ताईने 'तुम्ही तरोनी विश्व तारा' असा सार्थ विश्वास व्यक्त केला.

छत्रपति संभाजी महाराज


मायभूमीच्‍या एका वाचकाने संकलित करून पाठविलेला संभाजी या कादंबरीतील हा उतारा. मायभूमीवर प्रेम करणा-या तमाम वाचकांसाठी....लेखन श्रेय मूळ लेखकाचेच....


गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.

पाडवा.. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद'
मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना
- काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी -
भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.

'मूर्ती लहान, पण किर्ती महान'


एक सहा वर्षांचा मुलगा आपल्या काही मित्रांसह एका बागेत शिरला. बागेतील रंगीबेरंगी फुले पाहुन मुले हरखून गेली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर ते तोडण्यास सुरूवात केली. सर्वांनी भरभरून फुले तोडली, मात्र हा मुलगा सर्वांमध्ये लहान आणि ठेंगणा असल्याने तो मागे पडला. त्याने काही फुले तोडले तोच बागेतील माळी तिथे आल्याने सर्व मुले पळून गेली. हा सहा वर्षाचा मुलगा मात्र माळ्याच्या ताब्यात सापडला. माळ्याने सर्व मुलांचा राग या मुलावर काढून त्याला मारायला सुरूवात केली.

महात्मा गांधी

1
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

संत गाडगेबाबा

गाडगेबाबा जाऊन आता ४० वर्षे झाली. स्वच्छतेची, साफसफाईची बाबांना खूपच आवड होती. हातात झाडू घेऊन ते सतत साफसफाई करीत असत. गाडगेबाबा म्हणजे मूर्तिमंत कडकडीत वैराग्य ! जनसेवेसाठी सर्वार्थाने झोकून दिलेले आयुष्य, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कळवळणारी कनवाळू वृत्ती, हातात एक झाडू , झाडू नसेल तेव्हा काठी. झाडू घेऊन कुठेही घाण दिसली, कचरा दिसला की तो स्वत: दूर करावयाचा, स्वत: झाडलोट करावयाची, हा बाबांचा नियम. बाबा कोणाला नमस्कार करू देत नसत. त्यांच्या पायाला कोणी हात लावलेला त्यांना चालत नसे. त्यातही कोणी पुढे घुसून पायापर्यंत येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला हातातल्या काठीचा प्रसाद मिळे.

बॉलीवूडचा ठाकूरः संजीव कुमार

-विकास शिरपूरकर

हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेत्यांच्या यादीत संजीव कुमार यांचे नाव नेहमीच वरच्या स्थानी राहील. या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली.

9 जुलै 1930 ला सूरतमधील एका गुजराती कुटुंबात जन्मलेला हरिहर जरीवाला आपल्या अभिनयाच्या बळावर जगाला संजीव कुमार म्हणून परिचित आहे. सुमारे 25 वर्षांच्या (1960-85) मोठ्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 150 पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

अनादी मी, अनंत मी

- कै. आचार्य बाळाराव सावरकर

आपल्या देशावर असलेले परकीय इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्रयत्न केले. या देशभक्तांत एक गट होता शस्त्रवादी क्रांतिकारकांचा. हा गट सांगे इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी आपण येथील इंग्रज अधिकार्‍यांच्या मनात भीति उत्नन्न केली पाहिजे. त्यांना शस्त्राने ठार मारले पाहिजे. या गटात 1857 चे नेते नानाराव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रभृतिंची नावे प्रमुख आहेत.

'गुलझार' गीतांचा जनक

आपल्‍यातील सदाबहार आणि गुलझार सृजनात्‍मकतेने चित्रसृष्‍टीला अनेक अमूल्‍य गीतांची आणि वैविध्‍यपूर्ण पटकथांची देणगी देणा-या संपूर्णसिंग कालरा यांचा जन्‍म 18 ऑगस्‍ट 1936 साली झाला. तत्‍कालीन अखंड हिंदुस्‍तानच्‍या आणि सध्‍या पाकच्‍या ताब्‍यात असलेल्‍या झेलम जिल्‍ह्यातल्‍या दिना या गावी माखनसिंग आणि सुजान कौर या दाम्‍पत्‍याच्‍या घरी हा मुलगा जन्‍माला आला. त्‍यावेळी कुणी विचारही केला नसेल, की मोठा झाल्‍यावर तो सगळे भेदभाव मिटवून सर्वांना एकसंघ करणा-या एका वेगळ्या जगातला मोठा माणूस होईल.

Sinhagad In Rain


































हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...

भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांश राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्याला अपवाद होते. ते स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती.

स्वामी विवेकानंद

'ज्ञान हा जीविताचा आदि हेतू आहे. दुसरा हेतू सुखप्राप्ती आहे. या दोहोंच्या सांगडीनें हा विश्वसमुद्र तरून पैलतीरास तुम्ही जातां आणि तीच मुक्ती ! पण ही मुक्ती एकट्यालाच मिळवितां येत नाहीं. जगातील कीडमुंगीसारखे प्राणी मुक्त होतील तेव्हाच तुम्हांस खरा मुक्तिलाभ होईल. सर्व सुखी होईपर्यंत आपण एकटे सुखी आहोंत असे म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. तुम्ही कोणाला दु:ख देत असतां तेव्हा स्वत:च्या दु:खाचा पाया तुम्ही खणीत असतां हें लक्षात ठेवा.

महामानवः बाबा आमटे

Baba Amate
बाबांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंघणघाट येथे झाला. बाबांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार कुटुंब होते. श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती. सहाजिकच बाबांचे लहानपणही अतिशय ऐश्वर्यात गेले. बाबांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि तो हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे, बाबांच्या कुटुंबाची स्थिती सांगायला एवढी एक बाब पुरेशी आहे.

संत तुकाराम

थोर आणि अभिमानास्पद संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. ''मर्‍हाटाचि बोलु अमृतातेही पैजा जिंकण्यापर्यंत', उच्चतम स्तरापर्यंत नेऊन ठेवण्याची जिद्द बाळगणारे आणि त्याबरोबरच 'मर्‍हाठियेची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळु हवा' अशी श्रेष्ठतम आकांक्षा बाळगणारे श्री ज्ञानेश्वर, सर्वांभूती परमात्मा पाहणारे आणि समाजकल्याणाची अविरत कळकळ बाळगणारे संत एकनाथ,

सावता माळी


5262_Mahas माळियाचे वंशी, सांवता जन्मला | पावन तो केला | वंश त्याचा ||
त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी | धांवूनि त्याच्यामागें | काम करी ||
पीतांबर कास, खोवोनी माघारी| सर्व काम करी | निज अंगे ||
एका जनार्दनीं, सांवता तो धन्य| तयाचें महिमान | न कळें कांही ||
सांवता माळी हे ज्ञानदेव, नामदेव यांचे समकालीन.

राज ठाकरे

राज श्रीकांत ठाकरे एक झंझावात किंवा वादळ म्हणा हवं तर. राज ठाकरे यांचं नुसतं नाव उच्‍चारलं तरी मराठी माणसाच्‍या (बहुतांश) मनात मराठीचा स्‍वाभिमान जागा होतो. तर अमराठी विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारींच्‍या मनात रागाची किंवा द्वेषाची भावना. अनेक वर्ष राखेखाली धगधगत असलेल्‍या मराठीच्‍या मुद्याला राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे आंदोलन उभे राहिले.

माजी उपराष्‍ट्रपती भैरवसिंह शेखावत

- विकास शिरपूरकर

'राजस्‍थान का एकही सिंह- भैरोंसिंह भैरोंसिंह' या घोषणेने आपल्‍या असंख्‍य चाहत्यांच्‍या पाठिंब्यावर तीन वेळा राजस्‍थानच्‍या मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान झालेले भैरवसिंह शेखावत हे राजस्‍थानातील भाजपचे तगडे नेते समजले जात होते. स्‍वातंत्र्य प्राप्‍तीनंतरच्‍या कॉंग्रेसच्‍या लाटेत या पक्षाला कडवी झुंज देणा-या या नेत्यामागे शेतकरी, ठाकूर, राजपूत, ब्राह्मण, शिख आणि जैन व मुस्लिम समुदायाचाही मोठा पाठिंबा होता.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner