Sirte- Former Libyan leader Muammar Gaddafi died of wounds suffered on Thursday as fighters battling to complete an eight-month-old uprising against his rule overran his hometown Sirte, Libya's interim rulers said.
His killing, which came swiftly after his capture near Sirte, is the most dramatic single development in the Arab Spring revolts that have unseated rulers in Egypt and Tunisia and threatened the grip on power of the leaders of Syria and Yemen.
"He (Gaddafi) was also hit in his head," National Transitional Council official Abdel Majid Mlegta told Reuters. "There was a lot of firing against his group and he died."
Showing posts with label current news. Show all posts

एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
नवी दिल्ली
सध्याच्या काळात पिज्जा न आवडणारी व्यक्ती शोधून सापडणे तसे कठीणच, पण तुम्हाला हे माहिती आहे का? की एक किलो पिज्जा बनविण्यासाठी 12000 लीटर पाणी लागत असते. तर तुमच्या आवडत्या ब्रेडच्या एका स्लाइससाठी 40 लीटर पाणी वापरले जाते. थांबा हा आकडा इथेच थांबत नाही, तर सहज मुड आला म्हणून तुम्ही पीत असलेल्या एका लीटर बीयरच्या निर्मितीसाठी 300 लीटर पाण्याची नासाडी केली जाते.
Posted on Saturday, August 06, 2011
शरद पवार नावाचं गारूड
बाळासाहेब ठाकरेंसारखं समोरच्यांना आपल्या कवेत घेईल अमोघ वक्तृत्व नाही, लाखा-लाखांच्या सभा त्यांच्या भरत नाहीत, शिवसैनिकांसारखे जीव ओवाळून टाकतो, असे म्हणणारे कार्यकर्ते नाहीत, ते कधीही कोणताही आदेश देत नाही पण तरीही शरद पवार या नावाचं गारूड या महाराष्ट्रभर का असावं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित असतं. लाखाच्या सभा भरल्या नसल्या ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा
करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे.

Posted on Friday, December 10, 2010
आयफोन 4 कडून ग्राहकांची साफ निराशा
30 लाख फोन परत घेण्याची मागणी
बॅटरी आणि सिग्नल यंत्रणा अगदीच ढिसाळ
बॅटरी आणि सिग्नल यंत्रणा अगदीच ढिसाळ
- विकास शिरपूरकर
पुणे येणार-येणार म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या आणि संपूर्ण जग आपल्या मुठीत सामावू शकत असल्याचा दावा करणा-या एप्पलच्या अत्याधुनिक आयफोन 4 ने पदार्पणातच आपल्या तमाम चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले असून वारंवार खंडित होणारी सिग्नल यंत्रणा, एफएम रेडिओ सारख्या साध्या फिचरचा अभाव आणि लवकर डिस्चार्ज होणारी बॅटरी यामुळे एपलचा तो आजवरचा सर्वांत अपयशी फोन ठरला आहे.
Posted on Saturday, July 24, 2010
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १० जूनला मतदान
मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक गुरुवार दि. १० जून २०१० रोजी होणार असून विधान परिषदेच्या दहा रिक्त जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या निवडणुकीत विधानसभेचे २८८ सदस्य मतदान करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधान मंडळाचे प्रधान सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी अनंत कळसे यांनी गुरूवारी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी मुंबईत विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी सुभाषचंद्र मयेकर उपस्थित होते. श्री.कळसे पुढे म्हणाले की, गुरुवारी (१० जून) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून मतदानानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

Posted on Friday, June 04, 2010
डॉ. मंदाकिनी आमटे 'वूमन ऑफ द ईयर'
मुंबई
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ.मंदाकिनी आमटे यांना आयएमसी लेडिज विंग 'वूमन ऑफ द ईयर' पुरस्कार गुरूवारी प्रदान करण्यात आला. इंडियन मर्चंटस् चेंबरच्या चर्चगेट येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ.मंदाकिनी आमटे यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम आणि मागास भागात आरोग्य सेवेचे केलेले कार्य सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. यावेळी बँकिंग आणि आर्थिक सेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रेणू कर्नाड यांना जाहीर झालेला पुरस्कार अंजली तारापोर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला.

'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
झारग्राम
तृणमूल काँग्रेसच्या मागणीपुढे मान तुकवित, अखेर केंद्र सरकारने ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या घातपाताच्या घटनेची केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून (सीबीआय) चौकशी करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनजी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्ञानेश्वरी घातपाताची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आपल्याला रेल्वे मंत्रालयातर्फे मिळाल्याचे बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. झारग्राम घातपाताच्या सीबीआय चौकशीला आधी विरोध करणार्या राज्य सरकारने आता या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

Posted on Thursday, June 03, 2010
शिवराज्याभिषेक सोहळयास केंद्राची मंजुरी
मुंबई
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयातून परवानगी देण्यात आली असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. त्यामुळे शिवराज्याभिषेकावरून सुरू झालेला वाद संपुष्टात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच येत्या सहा जून रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयातून परवानगी देण्यात आली असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. त्यामुळे शिवराज्याभिषेकावरून सुरू झालेला वाद संपुष्टात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच येत्या सहा जून रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
Posted on Thursday, June 03, 2010
ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
नवी दिल्ली
सैन्यदलात इंजीनियर इन चीफ पदावर कार्यरत असलेल्या ले. जनरल ए.के. नंदा यांच्यावर सैन्यातच कार्यरत असलेल्या एका टेक्निकल सेक्रेटरीच्या पत्नीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार गेल्या महिन्यात इस्त्रायलच्या दौ-या दरम्यान त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या संदर्भात सैन्य दलाकडून प्रसारित करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार ले.जन. नंदा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून या आरोपांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचे सैन्यदलाचे म्हणणे आहे.

गुजरातला चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता
गांधीनगर/राजकोट
उष्माघाताने सर्वाधिक लोकांना जीव गमवावा लागलेल्या गुजरातवर आता सागरी चक्रीवादळाची भीती निर्माण झाली असून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या डीपडिप्रेशनचे रूपांतर चक्रीवादळात झाल्याने राज्यात गुरू व शुक्रवार दरम्यान किनारपट्टीच्या भागांना मोठ्या वादळाचा सामना करावा लागणार आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील शहरांमध्ये हायअलर्ट जाहीर करण्यात आला असून वादळाचा सर्वाधिक फटका पोरबंदर व नलिया भागाला बसणार आहे.

Posted on Wednesday, June 02, 2010
कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले
बुद्धदेव यांनी मुख्यमंत्रीपद सोडावेः ममता
कोलकाताकोलकाता महानगर पालिकेच्या 141 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने 95 जागांवर ताबा प्रस्थापित केला असून डाव्या आघाडीचा क्लीन स्वीप केला आहे. सीपीएमला केवळ 33 जागांवर समाधान मानावे लागले असून कॉंग्रेसने 10 व उर्वरितांनी सहा जागा जिंकल्या आहेत.
Posted on Wednesday, June 02, 2010
देशभरात उन्हामुळे जनजीवन विस्कळीत
गेल्या काही दिवसांपासून देशभरात उन्हाने हाहाकार माजविला असून आतापर्यंत उष्माघाताने देशभरात सुमारे 225 जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिना संपत असताना उन्हाबरोबर उष्णवारेही धोकादायक ठरत आहेत. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव जिल्ह्यात नोंदविण्यात आले असून जिल्ह्यातील फैजपूरमध्ये तर ते 49.4 पर्यंत पोचले आहे.
Posted on Wednesday, May 26, 2010
स्पाईस जेटच्या विमानाचे एमर्जन्सी लँडींग
195 प्रवाशांचे प्राण तासभर अधांतरी
नवी दिल्ली
दिल्लीहून श्रीनगरकडे जात असलेल्या स्पाइस जेटच्या एका विमानाच्या उड्डाणानंतर त्याचे टायर फुटल्याची शक्यता वर्तविली जात असून यामुळे विमानाची एमर्जन्सी लँडींग करण्यात आली आहे. विमानाचे टायरच फुटल्याने सर्व तपासण्या केल्यानंतरच ते प्रत्यक्षात धावपट्टीवर उतरविण्यात आले असून दिल्ली विमानतळावर आणिबाणीची घोषणा करण्यात आली होती. या विमानात 195 प्रवाशी होते.

Posted on Monday, May 24, 2010
नक्षलवाद व विमान अपघात नैतिक जबाबदारी माझीः पंतप्रधान
नवी दिल्ली
देशाचा पंतप्रधान या नात्याने मी संसदेला आणि लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. दंतेवाडातील नक्षलवादी हल्ला असो किंवा मंगळूरमध्ये झालेला विमान अपघात या सर्व घटनांना नैतिक दृष्ट्या मी जबाबदार आहे. देशासमोर यासारखी अनेक आव्हाने आहेत आणि ती सोडवण्यासाठी आम्हाला अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राष्ट्रीय पातळीवरील पत्रपरिषदेत दिले.

पाककडून सीमेवर रॉकेट हल्ला
जम्मू
पाकिस्तानी सुरक्षा दलाने रविवारी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन केले असून जम्मू व काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मेंधर भागातील कृष्णा खो-यात गोळीबार केला आहे. भारतीय सैन्यानेही यास प्रत्युत्तर दिल्यानंतर पाककडून रॉकेटचा मारा करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
जम्मूपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुंछमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलाने भारतीय ठिकाणांवर गोळीबारी केला असून या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. या घटनेनंतर भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामुळे बिथरलेल्या पाकी सैनिकांनी रॉकेटचा मारा सुरू केल्याची तक्रार संरक्षण दलाच्या सुत्रांनी केली आहे.

Posted on Sunday, May 23, 2010
विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला
मंगळूर
एअर इंडिया एक्सप्रेसच्या अपघातग्रस्त विमानातून व्हाईस रेकार्डर (सीपीआर) आणि फ्लाइट डाटा रेकार्डर
(एफडीआर) सापडले आहेत. यामुळे अपघाताच्या कारणांचा शोध लावणे शक्य होणार आहे. या अपघातात चालक दलाच्या सदस्यांसह 158 जणांचा मृत्यू झाला आहे.
सीव्हीआरमध्ये कॉकपिटच्या आत झालेले संभाषण आणि पायलट व एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संभाषण आहे. ब्लॅकबॉक्स नावाने ओळखल्या जाणा-या या उपकरणात तांत्रिम माहिती असते.

...असा घडला विमानाचा अपघात
एअर इंडियाचे एक्सप्रेस आयएक्स ८१२ हे विमान लॅंड होण्याची जागा चुकल्याने हा अपघात झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कमांडर जॅड ग्लुसिका आणि सहपायलट एच. एस. अहलुवालिया यांनी दुबईहून हे विमान मंगळूरला आणले होते. बाजपे विमानतळावर जिथे विमानाला जमिनीला स्पर्श करायचा होता, (टचडाऊन झोन) त्यासंदर्भात त्यांनी जमिनीपासून आकाशात दहा मैल असतानाच हवाई नियंत्रण कक्षाला (एटिसी) सूचना दिली होती.

Posted on Saturday, May 22, 2010
आता एसटीची ई-तिकीट सेवा
मुंबई
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आता एसटी प्रवाशांसाठी ई-तिकीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते दादर ते पुणे वातानुकूलित शिवनेरी गाडीचे ई-तिकीट आरक्षण करून या सेवेचे सह्याद्री अतिथिगृहात उदघाटन करण्यात आले.
एसटीने सुरू केलेल्या या नव्या सेवेमुळे विमान व रेल्वेच्या तिकिटाप्रमाणे आता एसटीच्या प्रवाशांनाही घरबसल्या किंवा एजंटच्या कार्यालयात जाऊन ई-तिकीट आरक्षित करता येणार आहे.
Posted on Friday, May 21, 2010
Subscribe to:
Posts (Atom)