चिरायु अमीन आयपीएलचे हंगामी अध्‍यक्ष

Posted on Monday, April 26, 2010 by maaybhumi desk

मुंबई

आयपीएलमध्‍ये भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपांचा सामना करीत असलेल्‍या ललित मोदी यांना आयपीएल अध्‍यक्ष आणि कमीशनरपदावरून बडतर्फ केल्‍यानंतर या पदावर हंगामी अध्‍यक्ष म्हणून वडोदरा क्रिकेट असोसिएशनचे अध्‍यक्ष चिरायु अमीन यांची निवड करण्‍यात आली आहे. अमीन बीसीसीआयचे उपाध्‍यक्षही आहेत.

आयपीएलच्‍या गव्‍हर्निंग कौन्सिलच्‍या बैठकीत याबाबत निर्णय घेण्‍यात आला असल्‍याची माहिती बीसीसीआय अध्‍यक्ष शशांक मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनोहर यांनी सांगितले, की ललित मोदी यांच्‍यावर अनियमिततचे 22 आरोप ठेवण्‍यात आले असून याबाबत बैठकीत चर्चा झाली. या प्रकरणी मोदींना कारणे दाखवा नोटीस बजावण्‍यात आली असून आयपीएलमधील भ्रष्‍टाचाराच्‍या कागदपत्रांबाबत रत्नाकर शेट्टी चौकशी करणार आहेत.

मोदींवरील आरोपांची चौकशी केल्‍यानंतर ते यात निर्दोष आढळले किंवा त्‍यांच्‍या स्‍पष्‍टीकरणामुळे गव्‍हर्निंग कौन्सिलचे समाधान झाले तर त्यांचे निलंबन रद्द केले जाऊ शकते असेही यावेळी मनोहर यांनी जाहीर केले.

आयपीएलमधील फ्रेंचायझी मालकांशी पुढील धोरणाबाबत चर्चा करण्‍यासाठी माजी क्रिकेटपटू रवि शास्‍त्री, सुनील गावस्‍कर व मन्‍सूर अली खान पटौदी यांची समितीतयार करण्‍यात आली असून ही समिती संघ मालकांशी बोलून पुढील निर्णय घेणार आहे.



Chirayu Amin to be interim IPL Commissioner

Mumbai


Chirayu Amin has been named as new interim IPL commissioner at the governing council meeting held at the BCCI headquarters. He is the president of Baroda Cricket Association.

Chirayu Amin is also head of Alembic chemicals and he would be the successor of Lalit Modi as he was suspended by the BCCI late last night. Chirayu Amin has never been very interactive with media but his experience has forced officials to confer the onus of successful extravaganza.

The BCCI president, Shashank Manohar has affirmed that many of the records were missing as the Income Tax department is asking daily from them. He said that they will stop the inquiry if satisfied with Modi’s response.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner