प्रभा राव यांचे निधन

Posted on Monday, April 26, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

राजस्थानच्या राज्यपाल प्रभा राव यांचे दिल्लीतील जोधपूर हाउस येथे बाथरूमध्‍ये पाय घसरून पडल्‍याने निधन झाले आहे. त्‍या पडल्यानंतर बेशुद्ध झाल्‍या होत्या. त्‍यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.


हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल असताना त्यांना तीन डिसेंबर रोजी राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner