मलेरियामुळे दरवर्षी साडेआठ लाख लोकांचा मृत्यू

Posted on Saturday, April 24, 2010 by maaybhumi desk

न्यूयॉर्क


जगभरात दरवर्षी मलेरियामुळे सुमारे 850,000 लोकांना जीव गमवावा लागत असल्‍याची आकडेवारी यूनिसेफने दिली असून यापैकी सुमारे 90 टक्के मृत्यू आफ्रीकन उपखंडातील गरीब देशांमध्‍ये होत असते.


युनायटेड नेशन्‍स इंटरनेशनल चिल्ड्रेंस इमरजन्‍सी फंडचे (यूनिसेफ) कार्यकारी निर्देशक एन व्‍हॅनेमन यांनी या संदर्भात दिलेल्‍या आकडेवारीनुसार सर्व देशांमध्‍ये मलेरियावर नियंत्रणा संदर्भात संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांच्‍याकडून निश्चित केल्‍या गेलेल्‍या आकडेवारीला पूर्ण करण्‍यासाठी 250 दिवस शिल्‍लक आहेत.


जागतिक मलेरिया दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला व्‍हॅनेमन यांनी मलेरिया विरोधात लढण्‍यासाठी सर्व देशांनी एकजुट होण्‍याचे आणि डासांवर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्‍याचे आवाहन केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner