'मायभूमी'चे लेखक व्‍हा!

Posted on Tuesday, April 27, 2010 by maaybhumi desk

होय, माय मराठीच्‍या सेवेसाठी झटणा-या प्रत्येकाचे 'मायभूमी'वर स्‍वागत आहे. तुम्ही कुठल्‍याही प्रकारचे लेखन करीत असल्‍यास आणि ते प्रकाशित व्‍हावं असं तुम्हाला वाटत असल्‍यास 'मायभूमी' तुम्हाला उपलब्‍ध करून देत आहे, एक मुक्‍तपीठ... 

एक संधी- आपले विचार जगभरात पसरलेल्‍या कोट्यवधी मराठी बांधवांपर्यंत  पोचवण्‍याची...

आपले यापूर्वी नेट जगतात प्रकाशित न झालेले स्‍वलिखित लिखाण आमच्‍याकडे पाठवा आणि आम्ही ते आमच्‍या असंख्‍य वाचकांपर्यंत पोचवू.
मग प्रतीक्षा कसली?
तुमचं कुठल्‍याही प्रकारचं लिखाण-

देशातल्‍या किंवा राज्‍यातल्‍या सामाजिक व राजकीय घडामोडीवरचं तुमचं परखड मत, तुमचे विचार, तुम्ही केलेली भटकंती अगदी तुमच्‍या गावाची महती आणि माहिती सांगणारा लेख किंवा तिच्‍या/त्याच्‍यासाठी म्हणून लिहीलेली पहिली चारोळी किंवा कविताही काहीही आपल्‍या या मुक्तमंचासाठी पाठवा. लिखाणाला साजेसे फोटो पाठवल्‍यास स्‍वागतच.

आपल्‍या शब्‍दांना वाट द्या, जगाच्‍या व्‍यासपीठावर येण्‍याची....

फक्त लेखन पाठवताना खालील गोष्‍टींची काळजी घ्‍याः

1. लेखन स्‍वलिखित असावे आणि समाजाच्‍या उपयोगाचे असावे. संकलीत असल्‍यास मूळ लेखकाच्‍या नावासह तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख असावा.
2. लेखन मराठी युनिकोडमध्‍ये (Mangal) किंवा (Krutidev) मध्‍ये टंकलिखित केलेले अथवा पीडीएफ फाईल प्रकारात असावे.

... आणि हो आपल्‍या लेखासह आपला थोडक्यात परिचय, पत्ता व लेखात प्रकाशित करण्‍यासाठी पासपोर्ट आकारातील छायाचित्र अवश्‍य पाठवा.

खाली दिलेल्‍या फॉर्ममध्‍ये आपले लेखन पेस्‍ट करून किंवा editor@maaybhumi.com या पत्‍यावर आपल्‍याला पाठवता येईल... 



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner