Showing posts with label vidarbha. Show all posts
Showing posts with label vidarbha. Show all posts

मुंबईची अंतिम सामन्‍यात 'रॉयल' धडक

मुंबई

आयपीएल-3 च्‍या फायनल सामन्‍यासाठी होत असलेल्‍या पहिल्‍या उपांत्य सामन्‍यात मुंबई इंडियन्‍सने रॉयल चॅलेंजर्सचा 35 धावांनी पराभव करून अंतिम सामन्‍यात धडक मारली आहे. पोलार्डच्‍या भेदक गोलंदाजी आणि जबाबदार फलंदाजीने संघाचा विजय सोपा केला. पोलार्ड सामनावीर ठरला.

रेल्‍वे रोको आणि निदर्शनांनी विदर्भ बंदला सुरूवात

नागपूर

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय विदर्भ संघर्ष समितीतर्फे बुधवारी बंदचे आयोजन करण्‍यात आले असून बंद यशस्‍वी करण्‍यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. हा बंद म्हणजे विदर्भवाद्यांचे शक्तीप्रदर्शनच राहणार आहे. बंद यशस्वी व्हावा यासाठी अनेक ठिकाणी धरणे, सभा आणि रेल्‍वे रोको आंदोलने करण्‍यात येत आहेत.

वेगळ्या विदर्भासाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या बंदच्‍या सुरूवातीलाच चांदूररेल्वे या ठिकाणाजवळ विदर्भ संघर्ष समितीने विदर्भ एक्स्प्रेस सुमारे दीड तास अडवून ठेवली.

दरम्‍यान, वेगळ्या विदर्भासाठी नक्षलवाद्यांची मदत घेण्याची घोषणा जाबूंतराव धोटे यांनी केल्‍याने सरकारी यंत्रणा सतर्क झाल्‍या असून अनेक ठिकाणी नीमलष्‍करी दलाला पाचारण करण्‍यात आले आहे.

राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या विदर्भात तैनात करण्यात आल्या आहेत. या सोबतच गृहरक्षक दलाचे 400 जवानही तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, विदर्भ बंद पूर्वीच काल पोलिसांनी सक्रीय होत अनेक विदर्भवादी कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली असून, काल दिवसभर शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. एकीकडे विदर्भ बंदच्या समर्थनार्थ निदर्शने होत आहे तर दुसरीकडे विदर्भबंदच्या विरोधात निदर्शने करण्यात येत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner